वैजापूर पंचायत समितीला रमाई व पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार

वैजापूर ,१८ मे  / प्रतिनिधी :-रमाई व पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वैजापूर पंचायत समितीला विभाग स्तरीय पुरस्कार मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे १६ मे रोजी झालेल्या कार्यक्रमात विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या हस्ते गटविकास अधिकारी एच.आर.‌बोयनथ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रमाई आवास योजनेअंतर्गत रमाई द्वितीय पुरस्कार व पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाविकास अभियान कालावधीमध्ये घरकुल पुर्ण करणे तसेच लाभार्थ्यांना वेळेवर हप्ता देणे, लाभार्थी निवड वेळेत करणे, लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे आदी निकषानुसार पंचायत समितीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना व प्रकल्प संचालक संगिता देवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती स्तरावर घरकुल विभागामध्ये विस्तार अधिकारी दिपक अकुलवार, बी.के. मोरे, वैभव मतसागर, युवराज रामकोर, सुरज मतसागर, गृहनिर्माण अभियंता राहुल आल्हाट, प्रमोद बेंगाल, समाधान शेळके, अक्षय पवार, भगवान जाधव, ज्ञानेश्वर हिवरडे, अविनाश मगर, वैभव सोमवंशी, नोडल अधिकारी अमेय पवार यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या सहकार्यामुळे ही कामगिरी करता आली अशी प्रतिक्रिया गट विकास अधिकारी बोयनर यांनी व्यक्त केली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ६ हजार ८९० व रमाई आवास योजनेअंतर्गत तालुक्यात २ हजार ६९५ घरकुले पुर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.