वैजापूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना येत्या दहा दिवसांत भरपाई मिळणार – आ. रमेश बोरणारे

वैजापूर ,१८ मे  / प्रतिनिधी :-अतिवृष्टीमुळे मागील खरीप हंगामात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी येत्या दहा दिवसांत भरपाई देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याने बळीराजा सुखावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १४ में रोजी छत्रपती संभाजीनगर येथे सामाजिक मेळाव्यासाठी आले होते. त्यावेळी वैजापुरचे आमदार रमेश पाटील बोरणारे व जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी खरीप हंगामात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नसल्याबाबत सांगत शेतकऱ्यांची नाराजी पोहचवली होती. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत येत्या दहा दिवसांत अशा बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे सुतोवाच केल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मागील वर्षी वैजापूर तालुक्यातील तब्बल ८२ हजार २६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नासाडी झाली होती. मात्र पंचनामे होऊनही शेतकऱ्यांशा नुकसान भरपाई न मिळाल्याने त्यांच्यात नाराजीचा सुर होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे कापुस, मका, तुला, बाजरी, भुईमुग या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांचे उत्पन्न घटले होते. प्रशासनाने पंचनामे करुन १११ कोटींचा निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. या शेतकऱ्यांच्या बॅकेतील आधार प्रमाणित खात्याची पडताळणी करण्यात येईल असे उपविभागिय अधिकारी राहुल गायकवाड यांनी सांगितले.

हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे-आ.रमेश पाटील बोरणारे 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे वैजापूर व पैठण तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. हे सरकार शेतकऱ्यांश न्याय देणारे आहे