बी.आर.एस पार्टीच्या १००० कार्यकर्त्यांना नांदेड येथे प्रचाराचे प्रशिक्षण 

नांदेड , १८मे / प्रतिनिधी :-येत्या १८ आणि १९मे रोजी दोन दिवस अनंता लॉन्स, गुरुजी चौक पूर्णा रोड नांदेड येथे भारत राष्ट्र पक्षाचे( BRS )राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण शिबिरात प्रामुख्याने महाराष्ट्रातील २८८ मतदार संघातील पाचशे पुरुष कार्यकर्ते आणि पाचशे महिला कार्यकर्त्या महाराष्ट्रातून उपस्थित राहणार असून त्यांची राहण्याची सोय “पंजाब भवन ” रेल्वे स्टेशन जवळ करण्यात आली असून , महाराष्ट्र मध्ये येणाऱ्या आगामी काळात पक्षाच्या वतीने हायटेक प्रचार करून रहदारी असणारे ठिकाण जसे की रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड ,शासकीय कार्यालय, आणि लोकांची रहदारी असणारे दर्शनी भागात मोठे, मोठे होल्डिंग बॅनर्स या माध्यमातून जाहिरात करण्यात येणार आहे ,संपूर्ण महाराष्ट्रात शहरी आणि ग्रामीण भागात हा हायटेक प्रचार केला जाणार असून प्रत्येक कार्यकर्त्यांना एक टॅब देण्यात येणार आहे त्याद्वारे मेंबरशिप ड्राईव्ह घेण्यात येणार आहे.

दिल्लीतील पक्षाचे मुख्य कार्यालयाच्या लँनशी जोडण्यात येणार आहे ,कुठल्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावात, विभागात, वार्डात ,किती मेंबरशिप केली, याची तंतोतंत माहिती मुख्यमंत्री के. सी .आर हे घेतील, “आपकी बार किसान सरकार “हा नारा घरोघरी पोहोचवण्यात येणार असून, तेलंगाना सरकारने केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती घरोघरी पोहोचवावी असा एकूण या प्रचाराचा भाग असणार आहे. नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी येथून प्रचाराचा नारळ फुटणार आहे . प्रचार साहित्यमध्ये पोस्टर्स, कम्प्लेट ,झेंडे ,पक्षाचे बिल्ले, आणि टोप्या यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असेल,

गेल्या आठवड्यापासून हैदराबाद येथे मॅरेथॉन बैठका होत असून ,ह्या बैठकीस माजी खासदार हरसिंग राठोड तसेच माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे तथा नांदेड, लोहा आणि छत्रपती संभाजीनगर, या ठिकाणी पक्षात प्रवेश घेतलेले अनेक नेते, प्रशिक्षण शिबिरा करिता मुंबई से महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी संपर्क संपर्कात असून त्यांना मार्गदर्शन करीत आहेत ,या शिबिरात विशेषतः शेतकरी संघटनेचे कर्मट कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचे कार्यकर्ते ,आणि आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे युवा  आणि महिला कार्यकर्त्या  , तसेच आदिवासी आणि मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते यांचा मोठा प्रमाणात सहभाग घेणार आहे,

तेलंगणा सरकारने ज्या लोकहिताच्या योजना राबवल्या आहेत जसे की ,शेतकऱ्यांना प्रति एकर दहा हजार रुपये अनुदान, तसेच शेतकरी बांधवांचा  नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला पाच लाख रुपयांची तात्काळ मदत, शेतकऱ्यांना 24 तास चांगल्या दर्जाची मोफत विज योजना, राज्यातील दलित बांधवा करिता  ‘दलित बंधू ‘योजना या योजनेतून दलित परिवार  उद्योग समूहात कसा जोडला जाईल त्याकरिता दहा लाख रुपयांची स्वयंरोजगारा करिता आर्थिक मदत , देशात कुठेही नाही इतका भव्य दिव्य 125 फुटाचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि  अलीकडे तेलंगाना सरकारच्या सचिवालयाला परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले तथा महिला प्रस्तुती नंतर तिला के.सी.आर . किट तसेच बारा हजार रुपयाची आर्थिक मदत, कन्या झाल्यास 13 हजार रुपये आर्थिक मदत , तथा अंध ,अपंग यांना ३५०० रुपये  दरमहा पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिकां करिता २५००रुपये पेन्शन योजना, आणि तेलंगाना मध्ये शेतकऱ्यांची एकही आत्महत्या होत नसल्याचा धुवाधार प्रचार महाराष्ट्रात होणार असून महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, नगर परिषद ,नगरपालिका महानगरपालिका, तसेच विधानसभा आणि लोकसभा या सर्व निवडणुका पक्ष ताकदीनिशी लढवणार असल्याचे माहिती भारत राष्ट्रीय समितीचे जेष्ठ नेते माजी खासदार हरीसिंग राठोड यांनी दिली.