वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील 4 कोटी रुपये खर्चाच्या रस्ता व पुलाच्या कामाचा माजी आमदार सुभाष झाबंड यांच्या हस्ते शुभारंभ

वैजापूर,८ जानेवारी /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील मौजे परसोडा येथे आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रयत्नाने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या दलितवस्ती, शांतीनगर परसोडा-बेंदवाडी ते एनच 752 – I (PMGSY ) या 5 किमी रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण (3 कोटी 71 लक्ष 64 हजार रुपये) व नाबार्ड योजने अंतर्गत परसोडा नदीवरील पुल बांधकाम (1 कोटी 47 लक्ष रुपये) अशा एकूण 5 कोटी रुपये खर्चाच्या कामांचा शुभारंभ आज (शुक्रवारी ता.7) माजी आमदार सुभाष झांबड यांच्याहस्ते व  माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेरखान, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, जिल्हा परिषद सदस्य रामहरीबापू जाधव, दिपकभाऊ राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष  सुभाष पाटील तांबे, तालुकाध्यक्ष  प्रशांत पाटील सदाफळ,शिवसेनेचे  शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, महिला तालुका संघटक वर्षाताई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती..याप्रसंगी श्री.बाविस्कर  (PMGSY उप कार्यकारी अभियंता) श्री.एस.बी.काकड (उपअभियंता सा.बा.विभाग) (सा.बा.उप कार्यकारी अभियंता)  उपतालुकाप्रमुख महेश पाटील बुनगे, मोहनराव  साळुंके, आनंदराव निकम , बाजार समितीचे सदस्य सुनिल कदम, विभागप्रमुख नंदकिशोर जाधव, प्रकाश मतसागर, उपविभागप्रमुख मल्हारी पठाड़े, शासकीय गुत्तेदार श्री.डावखर, भिकननाना लहामगे, संजय बोरनारे, रणजीत चव्हाण, राजुभाऊ राजपूत, कनिष्ठ अभियंता भुजंग साहेब, शेळके साहेब, राठोड मॅडम, महाविकास आघाडी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थीत होते.