वैजापूर बसस्थानकात वर्धमान पतसंस्थेतर्फे प्रवाशांसाठी पाणपोई

वैजापूर ,१० मे  / प्रतिनिधी :- सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या येथील वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे बस स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी पाणपोई सुरु करण्यात आली. या पाणपोईमुळे प्रवाशांना थंड व जारचे शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळणार आहे‌.

पतसंस्थेचे चेअरमन रुपेश संचेती, व्हाइस चेअरमन राजेंद्र पारख, माजी चेअरमन राजेश संचेती, हेमंत संचेती सर्व संचालक, निलेश पारख, महा व्यवस्थापक दिनेश राठी, व्यवस्थापक सुधीर लालसरे, आगार व्यवस्थापक किरण धनवटे या मान्यवरांच्या उपस्थितीत पाणपोईचे फित कापुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी संचालक प्रकाश बोथरा, गौतम संचेती, संजय मालपाणी, सागर संचेती, सचिन संचेती, विनीत संचेती, किशोर बिरारी, जितेंद्र पोंदे, आनंद त्रिभुवन, अक्षय कोठारी, काजी हाफिजोद्दिन, आर. एस‌. मुळे, जोगेंद्र ठाकुर, ए. ए. गंगवाल, ज्ञानेश्वर अनर्थे, महेश जाधव, रोहित जोशी, अमर वैष्णव, तुषार शर्मा आदींची उपस्थिती होती. पतसंस्थेने सुरु केलेल्या सामाजिक उपक्रमाचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन रुपेश संचेती यांनी केले.