बिहार राज्याच्या धर्तीवर राज्यात जात जनगणना तातडीने सुरू करावी-कॉग्रेसचे राज्य प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांची मागणी

जालना,२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-मोदी सरकारने उभे केलेले सर्व कायदेशीर, न्यायालयीन अडथळे पार करून बिहार सरकारने आज राष्ट्रपिता महात्मा गांधींजींच्या जयंतीदिनी बिहार राज्यातील जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली आहे असून असे करणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. संजय लाखेपाटील यांनी जाहीर अभिनंदन करुन आभार मानले आहेत. बिहारच्या धर्तीवर राज्यातील विविध समाज घटकांच्या आरक्षणाच्या मागणीचे विषय सोडवून त्यांना विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी महाराष्ट्रातही तातडीचे जातनिहाय जनगणना चालू व्हायला पाहिजे अशीही त्यांनी मागणी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कॉग्रेसचे नेते राहुल गांधी आणि ‘इंडिया’ आघाडीचे सर्व घटक राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना या आक्रमकपणे केंद्रसरकारने देशभर जातनिहाय जनगणना करावी आणि विविध जातीमधील आरक्षण वाद संपवण्यासाठी मागणी करत आहेत पण मोदी सरकार दस्स की मस्स’ व्हायला तयार नाही आणि ‘आरएसएस ’ धोरणानुसार देशात जातनिहाय जनगणना करत नाही. त्या पार्श्वभूमीवर ’इंडिया’चे नेते नितीन कुमार आणि तेजस्वी यादव यांचा हा निर्णय मागास जातींना न्याय देणारी धोरणे आखण्यासाठी नक्कीच अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहेच असेही डॉ. संजय लाखेपाटील यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच विविध मागासलेल्या सामाजिक घटकांना/ जात, जाती समुहांना नियोजनबद्ध रित्या आर्थिक तरतुदी करून न्याय देण्यासाठी असेल त्यांच्यावरील अन्याय दुर होण्यासाठी आणि असे जात समुह, समाज घटक विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने तातडीने देशभर दर दहा वर्षांनी होते  आणि जी २०२१मध्येच पूर्ण व्हायला पाहिजे होती परंतु कोविडचे कारण दाखवून पुढे ढकलली ती दशवार्षीक जनगणना तातडीने सुरू करावी तसेच सदर जनगणनेमधेच नागरिकांकडून भरून घ्यावयाच्या फॉर्म / ऑनलाईन माहिती प्रस्तावात ‘जात’ हा आणखी एक ‘अधिक’चा रकाना वाढवून तातडीने दोन वर्षांपेक्षा जास्त काळ लांबलेली देशाची जनगणना पूर्ण करावी आणि विविध मागास जातसमुहांना न्याय द्यावा अशी आग्रही मागणी डॉ. संजय लाखेपाटील यांनी केली आहे.