काँग्रेस पक्षाच्यावतीने गांधी आणि शास्त्री यांची जयंती साजरी

ईश्‍वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान

जालना ,२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-जालना जिल्हा काँग्रेस ग्रामीण  व शहर कमिटीच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती व देशाचे पंतप्रधान स्व. लालबहादुर शास्त्री यांची जयंती सोमवार रोजी जुना जालना गांधी चमन येथे साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आणि स्व. लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन काँग्रेस पक्षातर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी जालना जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे यांनी अभिवादन पर बोलताना सांगितले की, महात्मा गांधी यांनी देशाला अहिंसा, सदभावना आणि शांततेचा संदेश दिलेला आहे. काँग्रेस पक्ष यांच्याच विचाराने मार्गक्रमण करीत आहे.आज देशाला खर्‍या अर्थाने गांधीजीच्या विचारांची अत्यंत गरज आहे.परंतु काही जातीवादी मंडळी समाजामध्ये दुही  माजुन जातीय तेढ निर्माण करीत आहे. हे देशासाठी घातक असल्याचे या मान्यवरांनी सांगितले.
ईश्‍वर अल्ला तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान अशी सामुहिक प्रार्थना करण्यात येऊन स्व. लालबहादुर शास्त्री यांचा जय जवान जय किसान चा नारा बुलंद करण्यात आला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्व. लालबहादुर शास्त्री यांच्या राष्ट्रभक्तीचा विचार युवकांनी आत्मसात केला पाहिजे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी राम सावंत सुभाष कोळकर, सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष शेख इब्राहीेम, महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा नंदाताई पवार, अ‍ॅड. राम कुर्‍हाडे, चंदाताई भांगडीया, मंजु यादव, मंगलताई खांडेभराड, विभा लाखे, नुरजहा शेख, सय्यद करीम बिल्डर, फकिरा वाघ, नारायण वाढेकर, शेख वसीम भागवत घाटे, बाबासाहेब सोनवणे, योगेश पाटिल, गणेश चांदोडे, सिराज पटेल, शेख इरशाद, गजानन शेजुळ, अनस चाऊस, रहिम तांबोळी, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.