शिवसेनेच्या `होऊ द्या चर्चा’ मोहिमेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

राज्य व केंद्र सरकारच्या फसव्या योजनांचा केला भांडाफोड

जालना ,२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राज्यात १ ते १२ ऑक्टोंबर दरम्यान राज्य व केंद्र सरकारच्या फसव्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी `होऊ द्या चर्चा’ नावाची मोहिम सुरु केली.

जालना जिल्ह्यात शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी या मोहिमेसंदर्भात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दौरा करुन सर्व तालुकांचा दौरा करुन भोकरदन येथे उपजिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव, नवनाथ दौड, महेश पुरोहित, सुरेश तळेकर, जाफराबाद येथे उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, परमेश्वर जगताप, तालुकाप्रमुख कुंडलिक मुठ्ठे, बदनापूर येथे माजी आमदार
संतोष सांबरे, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण तर जालना विधानसभा मतदार संघात उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, रावसाहेब राऊत, बाबुराव पवार, मुरलीधर थेटे, शिवाजी शेजुळ, हरिहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकांची नेमणुक केली.

आज २ ऑक्टोंबर रोजी जालना विधानसभा मतदार संघातील राममुर्ती, सिंधीकाळेगाव, रामनगर, जळगाव सोमनाथ, बाजी उम्रद या गावांचा दौरा करुन तेथील ग्रामस्थांशी शिवसेना पक्षाचे उपनेते विठ्ठलराव गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी संवाद साधला. यावेळी उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी शिवाजी शेजुळ, तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, किसान सेनेचे जिल्हा संघटक मुरलीधर थेटे, उपतालुकाप्रमुखसखाराम गिराम, प्रभाकर उगले यांची प्रमुख उपस्थिती होती.

`होऊ द्या चर्चा’ ही मोहिम जिल्ह्यातील सर्व गावपातळीपर्यंत राबविण्यात येणार असून ग्रामस्थांना बोलके करुन त्यांच्या मनातील सरकार विषयीच्या भावना जाणून घेतल्या. या मोहिमेत भाषणांना फाटा देवून केवळ ग्रामस्थांशी मनमोकळे पणाने चर्चा करुन संवाद साधण्यावरच भर देण्यात आला. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधतांना उपनेते विठ्ठलराव गायकवाड म्हणाले की, सध्या
देशासह राज्यात असलेल्या शासनाच्या नाकर्त्या धोरणामुळे महागाई, बेरोजगारी या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या. त्यामुळे सामान्य माणसाचे जगणे अवघड झाले. निवडणुकीच्या काळात सत्ताधार्‍यांनी दिलेले आश्वासने पाळण्यात ते स्पशेल अपयशी ठरल्याने त्यांना आगामी सर्वच निवडणुकांत जागा दाखवून देण्याचे आवाहन केले.

जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, सर्वच ठिकाणी भाषणे न करता नागरिकांना कर्जमाफी, विमा, इंधन दरवाढ, खते, बि-बियाणे, औषधी यांच्यासहजीवनावश्यक वस्तुंची झालेली दरवाढ रोखण्यात केंद्र व राज्य सरकारला आलेले अपयश. शासनाच्या वतीने सर्वच क्षेत्रात येत असलेले खाजगीकरण यावर सामान्य नागरिक व शेतकर्‍यांना बोलते करीत भावना व्यक्त करण्यासप्रोत्साहीत केले. तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शेतकर्‍यांना महात्मा फुले शेतकरी
कर्जमुक्ती योजना राबवून लाखो शेतकर्‍यांना लाभ मिळवून दिल्याचे सांगत कोरोना काळातही राज्याला सुरक्षित ठेवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच सर्वच ठिकाणी झालेल्या चर्चेतून शेतकर्‍यांनी व ग्रामस्थांनी प्रचंड होणारी महागाई बद्दल रोष व्यक्त करत अतिवृष्टी अनुदान, पिक विमा, मुद्रा लोन या विषयांच्या शासनाच्या धोरणावरुन तीव्र
नाराजी व्यक्त केली. सर्वच ठिकाणी होत असलेल्या बैठकांना ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी तालुका संघटक उध्दव भुतेकर, बंजारा सेलचे तालुका संघटक शंकर जाधव,
अल्पसंख्याक आघाडीचे तालुका संघटक अमिर सय्यद, युवासेनेचे तालुकाप्रमुख संदीप मगर, विभागप्रमुख जनार्धन गिराम, ज्ञानेश्वर गोरे, उपविभागप्रमुख परमेश्वर डोंगरे, दिलीप डोंगरे, सरपंच सुभाष गिराम, अयुब परशुवाले, सरपंच गोपाल मोरे, बंडू केळकर, राजु जाधव, सुरेश रोडगे, पंढरीनाथ शिंगाडे, विष्णुपंत गिराम, बबनराव मिसाळ, रशिद सय्यद, सोपान मगर, चेअरमन तुळशीराम गिराम, गोपीनाथ शेळके, राम खर्जुले, दिलीप गिराम, सुभाष गिराम, राम गिराम, उमेश शिंदे, अर्जुन डोंगरे, रामेश्वर शेजुळ, रमेश कल्हापुरे, नारायण शेजुळ, सत्यनारायण आगलावे, श्याम शेजुळ, संदीप कल्हापुरे, किसन लकडे, बाबासाहेब ढोले, सुखदेव ढोले, अशिष चाळगे, सदाशिव भुतेकर, अर्जुन आर्दड, विठ्ठल सराटे, श्रीराम भुतेकर, बाबुराव पुंड, तान्हाजी ढोले,
विश्वनाथ ढोले, रामदास सवडे, आबादास सवडे, बाबासाहेब नागमुर्ती, बळीराम पडूळ, राजाभाऊ डोंगरे, आप्पासाहेब डोंगरे, गजानन कठोरे, दिंगबर कान्होरे, सलीम शेख, आण्णा गायकवाड, बाबासाहेब लहाने, सुरेश वाघमारे, किशोर तांबे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.