गृहमंत्री फडणवीस मराठा आंदोलकावर गोळीबार करणे चुक आहे की  बरोबर ?- छत्रपती संभाजी राजे भोसले

जालना ,२ सप्टेंबर /प्रतिनिधी :-छत्रपती संभाजी महाराज भोसले यांनी कालच्या घटनेनंतर आज अंतरवाली सराटी भेट देत आमरण उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली.
यावेळी छत्रपती संभाजी राजे भोसले म्हणाले की ,हे सरकार छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या विचाराने चालले सरकार म्हणतात मग त्याच छत्रपतीच्या रयतेवर  गोळया व मारहाण करतात हे कसले छत्रपती यांचे  विचार आहे.गृहमंत्री देवेंद्र  फडणवीस सांगा की  गोळया चालविणे चूक  का बरोबर सांगावे.  हे राज्य  गुलामगिरी, निजामशाहीचे सरकार आहे. शांतपणे मार्गानेचाललेले आंदोलन चिरडले जाते असेही  भोसले म्हणाले. 


मनोज जरांगे निमित्त असुन असुन हल्ला मराठा समाजावर असल्याचे भोसले यांनी सांगून केंद्रात सरकार तुमचे राज्यात तुमचे सरकार आरक्षण कसे मिळणार? आम्हाला सांगण्याऐवजी मराठा समाजावर अत्याचार केला घृष्णसपद कृत्य आहे.आजपर्यंत किती समिति स्थापन केल्या त्यासमितीने काहीच नेले कमिटी आणि बैठक 

एवढेच सरकरचे धोरण आहे का?सरकारने  दोन शब्द दिलगिरी व्यक्त केली नाही, हे निंदनीय आहे, यासंदर्भात सरकारने खुलासा करून ज्यांनी काही गोळीबार लाठीमार करायचे आदेश त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली.