न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जालना ,२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला जालन्यात जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीच्या वेळी ही घटना घडली.

भोकरदन तालुक्यातील धोंडखेडा येथील शेषराव कडुबा कोल्हे (वय 50) हे त्यांच्या मुलीसह जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आले होते.जावयाच्या मृत्यूप्रकरणी पारध पोलीस ठाण्यात 2017 मध्ये दाखल असलेल्या भादवि. 302 च्या गुन्ह्यात शेषराव कोल्हे हे आरोपी होते.दि.2 बुधवारी सकाळी सुनावणीदरम्यान शेषराव कोल्हे यांना चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले.
 त्यावेळी न्यायालयातील कर्मचारी आणि पोलिसांनी तातडीने  कोल्हे यांना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. शासकीय रूग्णालयात डाॕक्टरांनी कोल्हे यांना तपासले व मृत घोषीत केले.मयत शेषराव कोल्हे यांची मुलगी अरुणा घनघाव यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका जालना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश खाडे हे अधिक तपास करीत आहेत.