विनायक साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात सहकार मंत्र्याबरोबर आ.बोरणारे यांची ऑनलाइन बैठक

वैजापूर ,२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या तालुक्यातील विनायक सहकारी साखर कारखान्याच्या कामरारांची देय असलेली थकीत रक्कम अदा करणे व बंद असलेला कारखाना साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात  राज्याचे सहकार व पणन मंत्री मा.ना.बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व  आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार विभागाची बुधवारी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संयुक्त बैठक झाली.
राज्याच्या सहकार विभागातर्फे आयोजित या बैठकीस सहकार विभागाचे प्रधान सचिव, साखर आयुक्त पुणे, प्रादेशिक सहसंचालक (साखर) (औरंगाबाद), प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, कामगार प्रतिनिधी व शासकीय अभिहस्तांकिती विनायक  साखर कारखाना यांची उपस्थिती होती.

Displaying IMG-20220202-WA0142.jpg

तालुक्यातील विनायक सहकारी कारखाना चालू करावा व कामगारांची देय असलेली थकीत रक्कम अदा करण्यात यावी अशी विनंती करून आ.बोरणारे यांनी कारखाना सुरू करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.कामगार प्रतिनिधी म्हणून भास्कर मतसागर, भराडे, चव्हाण, कोतकर हे या बैठकीस उपस्थित होते.