“ओबीसींचा दर दहा वर्षांनी…”, मनोज जरांगे पाटलांच्या सरकारपुढे ‘या’ सात मुख्य मागण्या

जालना ,१४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-मराठा आंदोलनासाठी उपोषण करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा अवधी दिला आहे. या घटनेला आता ३० दिवस पूर्ण होत आहेत. अजून १० दिवस शिल्लक आहेत. सरकारला दिलेल्या वेळेनुसार आज जालन्यातील अंतवाली सराटी गावात भव्य सभा पार पडत आहे. यावेळी जरांगे यांनी समाज माध्यमांशी संवाद साधला. जरांगे यांनी सरकारसमोर काही मागण्या ठेवल्या आहेत.

मनोज जरांगे यांनी सरकार समोर ठेवलेल्या काही मागण्या

१. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन प्रत्येक मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा

२. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात यावी.

३. समाजासाठी समाजासाठी बलिदान दिलेल्या ४५ बांधवांवा सांगितलेला निधी, आणि कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी द्यावी.

४.ओबीसी आरक्षण दिलेल्या बांधवांचा दर दहा वर्षाला सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर बाहेर काढण्यात याव्यात.

५. सरकारने १० दिवसात मराठा समाजाा आरक्षण द्यावं.

६. सारथीमार्फत पीएडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे सर्व प्रयत्न ताततीने मार्गी लावण्यात यावेत.

७. महाराष्ट्रातील मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करुन आरक्षण द्या. NT, VJNT प्रवर्गासारखे टिकणारे आरक्षण द्या.

यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला होता. त्यातील ३० दिवस आज पूर्ण झाले. आता १० दिवस सरकारच्या हातात आहेत. त्यामुळे आता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावं. जर चाळीस दिवसांनंतर आरक्षण दिलं नाहीतर तर… मराठे अंगावर घेऊ नका. त्यांच्या विरोधात जाऊ नका. असं इशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिला.