बाळकृष्ण महाराज सुसज्ज अभ्यासिकेचे लोकार्पण

जालना ,२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रम, शासकीय भरती होण्यास तरूणांना गावपातळीवर च सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी  भराडखेडा ( ता. बदनापूर) येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून साकारलेल्या ह.भ. प. बाळकृष्ण महाराज सुसज्ज  आभ्यासिकेचे लोकार्पण दीपक दराडे यांच्या हस्ते करण्यात आले.  

लोकार्पण सोहळ्यास  सेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, चेअरमन रामदास बारगजे ,सरपंच भगवान बारगजे, रामेश्वर दराडे ,समाधान दराडे ,रामू दराडे, मुख्याध्यापक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. 
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही केवळ सुविधांच्या अभावामुळे त्यांना अडचणी येतात हे लक्षात घेता ग्रामस्थांनी एक बैठक घेऊन लोकवर्गणी द्वारे गावात अभ्यासिका केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेतला. दोन वर्गखोल्यांत 16 खुर्च्या असलेल्या अभ्यासिका कक्षात स्पर्धांसह विविध परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध करण्याचा मनोदय ग्रामस्थांनी व्यक्त केला. 

दरम्यान ग्रामस्थांनी उपलब्ध केलेल्या आभ्यासिकेचा फायदा घेऊन गावाचे नाव मोठे करणार असल्याचा निर्धार तरूणांनी बोलून दाखवला. लोकार्पण सोहळ्यास शिक्षक सिनगारे ,रुस्तुम मुळक, अर्जुन तुपे ,विलास तुपे, प्रकाश शिंदे ,संदीप दराडे, दत्तात्रय दराडे, बाबासाहेब दराडे ,बबन शिंदे ,दादाराव खुरमुटे, अंकुश जावळे ,बाळू मुळक, बद्री मुळक, कृष्णा दराडे ,त्र्यंबक दुधारे ,शिवाजी दराडे, राजू मुळक ,ब्रह्मा दराडे, एकनाथ जावळे ,विष्णू जावळे, अरुण दाभाडे, कैलास दराडे, बाबासाहेब दराडे, गजानन दराडे, दिलीप घोरपडे, नितेश घोरपडे, बाळू मस्के, बाबासाहेब मस्के ,परसराम शिंदे, संदीप दराडे, दत्तात्रय बारगजे ,परमेश्वर शिंदे, भाऊसाहेब दुधारे, सुनील दराडे, कांतीलाल खरात, रामनाथ मुळक, बाबासाहेब जावळे, नारायण भालेकर, दत्तू तुपे ,वैभव दराडे ,भरत दराडे ,अर्जुन दुधारे , रण जावळे यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 

तरूणांनी संधीचे सोने करावे : भाऊसाहेब घुगे 

विविध स्पर्धा, उच्च शिक्षणासाठी प्रवेश पुर्व परिक्षा,शासकीय  निमशासकीय, व्यावसायिक प्रशिक्षण भरतीच्या तयारी साठी गाव सोडून शहरात धाव घ्यावी लागत होती ग्रामस्थांच्या लोकसहभागातून विद्यार्थ्यांची फरपट थांबली असून गावपातळीवर मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन तरूणांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी असे आवाहन  सेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी या वेळी केले. क्रमिक पुस्तके, संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून देण्यास हातभार लावणार असल्याचे भाऊसाहेब घुगे यांनी नमूद केले.