आ.मनिषा कायंदे यांच्या निधीतून बदनापुर ग्रामीण रुग्णालयासाठी सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण

जालना ,२३ जानेवारी /प्रतिनिधी :-मानव विकास निर्देशांकात खाली असलेल्या बदनापुर तालुक्यातील जनतेला जलदगतीने आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी,शेतीस मुबलक पाणी, सिंचन क्षेत्रात वाढ होऊन शेतकरी सुखी व्हावा, शासकीय अनुदान, मदत शेवटच्या शेतकऱ्यांस मिळाली पाहिजे यासाठी प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधी, मंञालय स्तरावर पाठपुरावा करणारे भाऊसाहेब घुगे यांनी शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण प्रत्यक्ष कृतीत उतरवली असून प्रत्येक गावात युवा सैनिकांनी  भाऊसाहेब घुगे यांच्यासारखे आरोग्य सेवक  व्हावे. असे आवाहन शिवसेना प्रवक्त्या आ. मनिषाताई कायंदे यांनी  आज रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले. 

May be an image of 5 people

हिंदुऱ्हदयसम्राट, शिवसेना प्रमुख, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त रविवारी ( ता. 23) आ. मनिषाताई कायंदे यांच्या निधीतून बदनापुर ग्रामीण रुग्णालयासाठी  मंजूर झालेल्या सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण आ. कायंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षस्थानी शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर हे होते. मा. वि. म. च्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे, जि. प. अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, माजी आ. संतोष सांबरे, युवा सेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, भानुदासराव घुगे, माधवराव कदम, जयप्रकाश चव्हाण, सविताताई किवंडे, भरत सांबरे, जि .प.  सदस्य कैलास चव्हाण, गणेश डोळस, सभापती बी. टी. शिंदे,पुजा टेहरे,सुनील बनकर, वैद्यकीय अधिकारी प्रशांत वाडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आ. मनिषाताई कायंदे यांनी शिवसेना पक्ष किमयागार असून जनतेची कामे करत रहा पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे द़खल घेतात. असा सल्ला त्यांनी दिला. विकासासाठी पाठपुरावा कसा करावा, त्यासाठी असलेली चिकाटी, सातत्य, हे भाऊसाहेब घुगे यांच्या वक्तीमत्वातील गूण प्रभावीत करणारे असून शिवसैनिक, युवा सैनिकांनी आरोग्य सेवेवर भर द्यावा. असे आवाहन आ. मनिषाताई कायंदे यांनी केले. जालना जिल्ह्यात शिवसेना प्रमुख, पक्ष प्रमुखांना अभिप्रेत असलेले कार्य सुरू असल्या बद्दल आ. मनिषाताई कायंदे यांनी समाधान व्यक्त केले. मा. वि. म. च्या अध्यक्षा ज्योती ताई ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विराजमान झाल्यानंतर विरोधकांची पोटदुखी वाढली आहे. असे सांगून संकटांना निधड्या छातीने तोंड देत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यकारभार चालवला असून गरजांचा प्राधान्य क्रम ठरवून भाऊसाहेब घुगे यांच्या प्रमाणे पदाधिकारी व युवा सैनिकांनी निधी मागावा. असे ज्योतीताई ठाकरे यांनी नमूद केले. माजी. आ. संतोष सांबरे यांनी कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत केलेल्या कार्याची माहिती देत. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर व जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांनी जिल्हा नियोजन मंडळातून कोवीड सेंटर साठी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे सांगितले. कोवीड योध्दे डॉक्टर, परिचारिकांचा या वेळी सत्कार करण्यात आला. 

सुञसंचालन आशीष रसाळ यांनी केले तर भरत सांबरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पं. स. सदस्य अरूण डोळसे, भरत मदन, श्रीराम कान्हेरे, कृष्णा खांडेकर,  नारायण जाधव, छाया जऱ्हाड,  नंदू दाभाडे, पद्माकर पडोळ,अमोल ठाकुर,गणेश मोहिते, नागेश डवले,रावसाहेब राऊत,बाला परदेशी, विशाल पडोळ, एन .डी.कडोस, संजय जाधव, अंकुशराव शिंदे,राजू जऱ्हाड, शिवाजीराव मदन, सिताराम गोरे, राजू थोरात, महादु गिते, संजय बळप, केशव क्षीरसागर, संभाजी अवघड, परमेश्वर माञे, संतोष नागवे, गजानन बकाल, विजयाताई चौधरी,राधाताई वाढेकर, सीमा पवार, दुर्गा देशमुख, ज्योती बोर्डे,, गंगुबाई वानखडे, मंजू घायाळ, मंगल मेटकर ,आशा पवार, रुपाली लहाने ,,संगीता नागरगोजे, राजू जऱ्हाड, भगवान जाधव, कैलास खैरे, रऊफ पटेल,  प्रसाद चव्हाण, कैलास दुधानी, महेश शेजुळ, मछिंद्र होळकर, विलास पवार, गोरख लांबे, एलिया कांबळे, राहुल जऱ्हाड, आनंद इंदानी, शिवाजी कऱ्हाळे यांच्या सह पदाधिकारी व युवा आदींची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी ते साठी युवा सैनिकांनी परिश्रम घेतले.
सेवेचा वारसा गतीमान केला : माजी मंत्री खोतकर 

संकटं आणि गरज भासेल तिथे सर्वसामान्यांसाठी  शिवसैनिक तत्पर असला पाहिजे. हा शिवसेना प्रमुखांनी दिलेला सेवेचा वारसा युवा सेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व युवा सैनिकांनी गतीमान केला. असे गौरवोद्गार माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी अध्यक्षीय समारोपात बोलतांना व्यक्त केले. युवा सैनिकांनी आप-आपल्या परिसरातील जनतेच्या गरजा शोधून भाऊसाहेब घुगे यांच्या प्रमाणे  सेवा उपलब्ध करून द्याव्यात. अशी अपेक्षा ही माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी या वेळी व्यक्त केली. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा संपूर्ण देशभरात होता. दिल्ली सुध्दा त्यांना हादरत होती. असे नमूद करत अर्जुनराव खोतकर यांनी शिवसेना प्रमुखांच्या आठवणींना उजाळा दिला. 
विकासासाठी घुगे यांचा चाणाक्षपणा लाभदायक  : आंबेकर

शिवसेनेचा उगम झाला तेव्हा शिवसेना प्रमुखांनी सर्व प्रथम रुग्णवाहिका कार्यान्वित केल्या. आपल्या भागात काय हवे याचा विचार करून आरोग्य सेवा निवडलेल्या भाऊसाहेब घुगे यांचा चाणाक्षपणा विकासासाठी लाभदायक असल्याचा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांनी व्यक्त केला. आमच्या जिल्ह्यात मनोरुग्ण वाढत चालले  असून आ .मनिषाताई कायंदे यांनी भविष्यात मनोरुग्ण वाहिका उपलब्ध करून द्यावी.अशा शब्दांत आंबेकर यांनी विरोधकांना चिमटा काढला.
ट्रामा केअर सह कायमस्वरूपी फिरता दवाखाना द्यावा : भाऊसाहेब घुगे  

बदनापुर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट व्हावी, आरोग्य केंद्रांच्या सोबतच दुर्गम भागात गावपातळीवर महिला, बालके, वृध्द, व जनतेला तातडीने सुविधा उपलब्ध व्हावी या साठी बदनापुर येथे ट्रॉमा केअर ची उभारणी करावी, तालुक्यास स्वतंत्रपणे तज्ञ डॉक्टर्स व सर्व सुविधा युक्त असा फिरता  दवाखाना उपलब्ध करून द्यावा. अशा आग्रही मागण्या  युवा सेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी यावेळी केल्या. आ. मनिषाताई कायंदे यांनी तालुक्यातील जनतेला रुग्णवाहिका उपलब्ध करून देत मोठा दिलासा दिला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवेसाठी युवा सेनेच्या  वतीने ” आदित्य आरोग्य सेवा रथ ” प्रत्येक गावात नेऊन महिला, बालके,वृध्दांची तपासणी केली जाईल. असे नमूद करत भाऊसाहेब घुगे यांनी आमच्या प्रयत्नांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पर्यंत पोहचवावे तसेच महिला व युवतींसाठी बदनापुर येथे ‘ वन स्टॉप सेंटर’  उभारणी साठी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा ही भाऊसाहेब घुगे यांनी या वेळी केली.