औरंगाबाद स्मार्ट शहर बससेवा सुरू

औरंगाबाद,२३ जानेवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद स्मार्ट शहर बस विभागातर्फे प्रवाश्यांच्या सेवेसाठी स्मार्ट शहर बस सेवेच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त 23 जानेवारीपासून शहर बससेवा सुरू करण्यात आलेली आहे.मागील 77 दिवसांपासून बंद असलेली शहर बस सुरू झाल्यामुळे प्रवाश्यांनी प्रशासनाचे आभार मानले.

सकाळी 10 वाजता पुष्कल शिवम उप मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. सी. डी. सी. एल. औरंगाबाद, राम पवणीकर मुख्य चालन व्यवस्थापक स्मार्ट शहर बस विभाग, मेजर सैय्यदा फिरासत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिद्धार्थ बनसोड आणि माणिक नीला यांच्या उपस्थितीत तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त स्मार्ट शहर बस प्रवाश्यांच्या सेवेत रुजू करण्यात आल्या.


यासाठी डी. आर. रावते आगार व्यवस्थापक , बी. बी. वाघ वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक आणि मेकॅनिक टीमने आजच्या संपूर्ण वाहतुकीचे नियोजन केले.
प्रवाश्यांनी कोविडच्या सर्व नियमांचा अवलंब करून बस सेवेचा लाभ जास्तीत जास्त प्रवाश्यांनी घेण्याचे आवाहन स्मार्ट शहर बस विभागाने केले आहे.