आर्थिकद्दष्या दुर्बल घटकातील होतकरू विद्यार्थ्यांना 17 लाख रुपये शिष्यवृत्तीचे वाटप रविवारी जालन्यात

जालना,२५ मार्च /प्रतिनिधी :-जालना जिल्ह्य़ातील  एकशे पंचेवीस विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी लोकसहभागातून आर्थिक साह्यता शिष्यवृत्ती देण्यात येत आहे अशी माहिती  जालना एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेचे अध्यक्ष सुनील रायठठ्ठा आणि प्रा.सुरेश लाहोटी यांनी दिली.   

जिल्ह्यातील आर्थिकद्दष्या दुर्बल घटकातील होतकरू विद्यार्थ्यांना  17 लाख रुपये  शिष्यवृत्तीचे वाटप रविवारी बजाज ऑटो कंपनीच्या सामाजिक साह्यता उपक्रमाचे प्रमुख सल्लागार चंद्रप्रकाश त्रिपाठी ,जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल आणि निवृत्त प्राचार्य रामलाल अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  

महाराष्ट्रातील एका जिल्हापुरत्या मर्यादित असलेल्या सर्वात मोठ्या मोजक्या शिष्यवृत्ती योजनेपैकी ही एक योजना  आहे. शिष्यवृत्ती प्रदान सोहळा रविवार दि. 27 मार्च रोजी सकाळी 11 वाजता महाराजा अग्रसेन फाउंडेशनमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती जालना एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक  लाहोटी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या आड आर्थिक अडचण येऊ नये यासाठी गुणवत्ता आणि संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटूंबाच्या आर्थिक निकषावर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत आणि दहावी अथवा बारावी परीक्षा जालना जिल्ह्यातून उत्तीर्ण केलेली असावी, अशी अट असून. या शिष्यवृत्ती साठी  400 अर्ज प्राप्त झाले  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी व सर्वेक्षण  आर्थिक परिस्थितीच्या निकषांवर  गुणवत्तेनुसार  विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या  मुलाखती घेवून अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यात 125 विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येत आहे.       

जालना एज्युकेशन फाउंडेशन हे माध्यम असून, दानदात्यांनी दिलेली संपूर्ण रक्कम थेट विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत कलश सीड्सच्यावतीने 11 वी सायन्सच्या 32 विद्यार्थ्यांना पंचेवीस हजार , एसआरजे पित्ती ग्रुप आणि भाईश्री फाउंडेशनच्यावतीने पॉलिटेक्निकच्या 43 विद्यार्थ्यांना पंधरा हजार,  कालिका स्टीलच्यावतीने 11 वी कॉमर्सच्या 8, सीए फाउंडेशनच्या 7 आणि सीए-आयपीसीसीच्या 4 विद्यार्थ्यांना दहा हजार ,  भाईश्री फाउंडेशन, राजेश देवीदान, एसआरजे पीत्ती ग्रुप, शिवरतन मुंदडा, नरेंद्र लूनिया यांच्या वतीने इंजिनिअरींगच्या 9 विद्यार्थ्यांना पंचेवीस हजार , डॉ. महेंद्र करवा, रामकिशन मुंदडा, डॉ. शुभांगी दरक, डॉ. विशाल पंजाबी यांच्या वतीने एमबीबीएसच्या 4 विद्यार्थ्यांना पंचेवीस हजार  कलश सीड्सच्यावतीने बी-फार्मसीच्या 3 विद्यार्थ्यांना पंचेवीस हजार  तर विनोदराय इंजिनियर्सच्या वतीने जालना एज्युकेशन फाउंडेशन संस्थेच्या  13 विद्यार्थ्यांना पंधरा हजार  शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. एकूण 125 विद्यार्थ्यांना 17 लाख रुपयांची शिष्यवृत्ती वाटप करण्यात येत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यमान शिक्षणाच्या  अंतिम वर्षापर्यन्त दरवर्षी ही शिष्यवृत्ती देण्यात येणार असून दरवर्षी यात नवीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार असल्याचे लाहोटी यांनी सांगितले. प्रास्ताविक सुरेश केसापूरकर यांनी केले सपना गोयल,प्रा स्वप्निल सारडा उपस्थित होते