आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काढली जालना जिल्हा प्रशासनाची खरडपट्टी

सुरेश केसापूरकर

जालना :आपण कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की जालन्यात करोना संसर्गाच्या हजार केसेस होतील.मला वाटते आपल्या प्रशासनाची कमिटमेंट लेव्हल कमी पडत आहे, जिल्ह्यात  जनजागृतीचा अभाव आहे.  सगळ्यांच्या सुट्या रद्द करा, कुठलीच तडजोड नको इथे साधनसामुग्रीची कोणतीच कमतरता नसताना संसर्ग वाढतो कसा? या शब्दात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अतिशय तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हा प्रशासनाची खरडपट्टी काढली.    

जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोव्हीड-19 आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेचे ई-पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन आज करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे,आ.राजेश राठोड व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की,सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या आहेत ,सॅनिटायजर, मास्क, पीपीई किट सगळ्यात लवकर आणि आवश्यकतेपेक्षा कितीतरी जास्त दिल्या आहेत.टीम वर्कने काम करा,आरोग्य सर्व्हेक्षण एकदम कडकपणे परिणामकारक  झाले पाहीजे, धारावी, मालेगाव कंट्रोल होते  जालन्यात कसे काय  चॅलेंज निर्माण झाले आहे?  आपल्याला जालन्यात  भेटायला नगर,औरंगाबाद, नांदेड हून लोक येतात कसे तेच सांगतात  शहराच्या प्रवेशाच्या पाॅईन्टवर  पोलिस अडवत नाहीत.चौकशी करत नाहीत याचा अर्थ काय? अंबड,परतूर, भोकरदन या सगळ्याच तालुकास्थानावरील ठाणेदार काय करतात.  तिकडे बाजारात गर्दी होतेच तिथे नियंत्रण केले पाहिजे अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. 
जिल्ह्यात करोनाच्या संदर्भात लोकांपर्यंत जनजागरण मोहीम कमी झालीय असे केन्द्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. करोना तपासणी प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने वापरली पाहिजे असे म्हणण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. केंद्र  व राज्य सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे,कडकपणे कारवाया करा पण संसर्ग तातडीने आटोक्यात आला पाहिजे.लोकांची मदत, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था यांची मदत घ्यावी अशा त्यांनी सुचना केल्या. 

उद्योजक राजेन्द्र बारवाले यांच्या सहयोगातून 50 लाख रूपयांचा लिक्विड ऑक्सिजनचा प्लांट जालन्यात सुरू होत आहे, तरूण वयातील मुले अचानकपणे जात आहेत काही समजत नाही सर्दी,ताप खोकला तीन तीन दिवस अंगावर काढतात त्यानंतर आपल्याला फोन करून काय करू विचारतात टेस्टींग मध्ये पाॅझिटीव्ह आढळून येतात  पण घाबरून जाण्याचे कारण नाही पण काळजी घेतली पाहिजे येत्या 15 ऑगस्ट पर्यंत करोनावर लस येईल असे आयसीएमआरचे डाॅ भार्गव यांनी सांगितल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. 
प्रास्ताविक जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ मधुकर राठोड, डॉ.सूर्यकांत हयातनगरकर या प्रसंगी उपस्थित होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *