जालना जिल्ह्यात 81 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह

49 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

जालना, दि. 6 (जिमाका) :- जिल्हा सामान्य रुग्णालयातून जालना शहरातील मिशन हॉस्पीटलसमोर -1, व्यंकटेशनगर -1, संभाजीनगर -1, पोलीस ऑफीस क्लब- 1, पेन्शनपुरा -1, बागवान मस्जिद -1, वसुंधरा नगर-1, श्री कॉलनी -6,रहेमानगंज-11, खडकपुरा-6, मानेपुरी ता.घनसावंगी -1, बन्सीपुरा -1, धामणी ता.परतुर -1, रहेमान गल्ली -1, गोपाळपुरा-1, जाफ्राबाद -1, टेंभुर्णी ता. जाफ्राबाद -11, भारज बुद्रुक ता. भोकरदन-1, नुतन कॉलनी ता. भोकरदन -1, अशा एकुण 49 रुग्णास डिस्चार्ज तर जालना शहरातील मोदीखाना 05, मिशन हॉस्पीटल परिसर-05, पोलासगल्ली 02, बन्सीपुरा 14, पेन्श्नपुरा 03, जेईएस महाविद्यालय 02, दुर्गामातारोड 05, जेपीसी बँक कॉलनी 02, मंगळबाजार 02, काद्राबाद 04, संभाजीनगर 04, अंबर हॉटेल परिसर 01, मस्तगड 03, हकिम मोहल्ला 01, गोपाळपुरा 01, लक्ष्मीनगर 01, शिवनगर 01, रामनगर 01, व्यंकटेश नगर 01, श्री नगर 01, नयाबाजार 01, सहयोग नगर 01, झांशीराणी चौक 01 सकलेचा नगर 01, चार्वापुरा नयाबाजार 01, चौधरीनगर 01, शेकडा नगर 1, नाथबाबा गल्ली 01, दु:खीनगर 01, कृष्णकुंज 01, कैलासनगर,बदनापुर 01, घनसावंगी शहर 04, मैसनपुर 02, बाजीउम्रद ता. जालना 01, रोहिलागड ता. अंबड 04 अशा एकुण 81 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–4746 असुन सध्या रुग्णालयात-235 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1811, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–141 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-6152, एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने–81 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-800 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-5187,रिजेक्टेड नमुने-11, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-413 एकुण प्रलंबित नमुने-154, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1547.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–03, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती–1366, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-118,सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-588, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-53, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-235,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-69, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-49, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-465, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-279 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-28, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-15337 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-28 एवढी आहे.

जालना शहरातील दर्गावेस परिसरातील 53 वर्षीय महिला रुग्णास श्वसनाचा, न्युमोनिया, उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे दि. 30 जुन 2020 रोजी ‍जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांच्या स्वॅबचा रिपोर्ट दि. 2 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच त्यांचा मृत्यु दि. 5जुलै, 2020 रोजी झाला.

जालना शहरातील पेन्शनपुरा परिसरातील 70 वर्षीय महिला रुग्णास न्युमोनिया, मधुमेह,उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे दि. 4 जुलै 2020 रोजी ‍जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या स्वॅबचा रिपोर्ट दि. 6 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच त्यांचा मृत्यु दि. 6 जुलै 2020 रोजी झाला.

आज संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 588असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-02,शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना-29,संत रामदास वसतिगृह जालना-18, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-13, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-62,मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-32, जे ई एस मुलांचे वसतिगृह 57, जे ई एस मुलींचे वसतिगृह -51, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक- 71, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक- 20,मॉडेल स्कूल परतुर-10, केजीबीव्ही परतुर- 11,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-09,शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-50, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-03, ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-02,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-35, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन 12, शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन 45, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, भोकरदन इमारत क्र 02-40,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -03,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-08,आयटीआय कॉलेज, जाफ्राबाद-05.

लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस 180 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 907 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 833 वाहने जप्त, आय.पी.सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 81 हजार 300, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 5 लाख 40 हजार 930 असा एकुण 6 लाख 49 हजार 038 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *