राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी श्याम राजपूत यांची निवड

वैजापूर ,​४​ मे  / प्रतिनिधी :- राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी वैजापूर शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष व विद्यमान प्रदेश सरचिटणीस श्याम राजपूत यांची एकमताने निवड झाली.

राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत २०२३-२६ ची कार्यकारिणी निवडण्यात आली. राजपूत हे गेल्या २५ वर्षांपासुन शिक्षक चळवळीत कार्यरत असुन त्यांनी जिल्हा परिषदेचे निमंत्रित सदस्य म्हणुन आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे‌.‌संघटनेचे राज्यानेते उदय शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे व सरचिटणीस राजन कोरेगावकर यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली. विजय साळकर, नितिन नवले, रणजित राठोड, सतीश कोळी, के.के. जंगले, शिवाजी डुकरे, लक्ष्मीकांत धाडबळे, के.डी. मगर, रऊफ पठाण, कडुबा साळवे, राजु ठाकुर, अविनाश डोळस, पंडित भोसले, लक्ष्मण घुगे, सतीश जाधव, पंकज मंडगे यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.