राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षाचा निर्णय ५ तारखेला

मुंबई: निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं अशी खंत व्यक्त करत त्यांनी ६ मे ऐवजी ५ मे रोजी बैठक घ्यावी आणि त्या बैठकीतील निर्णय मला मान्य आहे असं विधान केलं आहे.

शरद पवार म्हणाले की, मी वरिष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं असं मला आता वाटतं आहे. पण मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोधच केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला.

शरद पवार म्हणाले की, मी वरिष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं असं मला आता वाटतं आहे. पण मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोधच केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला.

शरद पवार पुढे म्हणाले की, १ मे १९६० रोजी मी मी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती, त्यामुळे माझं १ मे सोबत माझं अतुट नातं आहे. मी युवक काँग्रेसच्या बैठकीत भाकरी फिरवण्याचं वक्तव्य केलं होतं. मी युवकांची मतं विचारात घेणारा नेता आहे. त्यामुळे तुमच्या मतांचा मी आदर करतो. मला ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना मुख्य प्रवाहात आणायचे आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा  राष्ट्रवादी  प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा

image.png

शरद पवारांनी आपली निवृत्ती जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटातून नवनवीन बातम्या समोर येत आहेत. शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा यासाठी सर्व कार्यकर्ते, नेते आक्रमक झाले आहेत. अशातच आता शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून हा निर्णय घेतल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी देखील शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. अद्याप पवारांनी राजीनामा मागे घेतलेला नाही. म्हणून याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला, त्यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत. 

महाविकासआघाडीची वज्रमुठ झाली सैल 

महाविकासआघाडीच्या पुढच्या वज्रमूठ सभा रद्द झाल्याची माहिती आता समोर आली आहे. प्रफुल पटेल यांनी मात्र शरद पवारांच्या राजीनाम्याचा आणि वज्रमूठ सभा रद्द व्हायचा काहीही संबध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. गरमीच्या तडाख्यामुळे वज्रमूठ सभा टाळावी किंवा पोस्टपोन करावी, अशी चर्चा मुंबईतल्या सभेवेळीच स्टेजवर नेत्यांमध्ये झाली. सभा रद्द व्हायचा आणि पवार साहेबांच्या राजीनाम्याचा संबंध नाही. वज्रमूठ सभा आणि महाविकासआघाडीची चर्चा करायला आम्ही इथे बसलेलो नाही, असं प्रफुल पटेल म्हणाले आहेत.

सुप्रिया सुळे पुढच्या अध्यक्ष?

सुप्रिया सुळेंचं नाव अध्यक्षपदासाठी येणं हे स्पेक्युलेटिव्ह आहे, भुजबळ साहेबांनी त्यांचं मत व्यक्त केलं. माझं वैयक्तिक मत मांडू शकतो. राष्ट्रवादीमध्ये एकवाक्यता आहे, पक्षात कोणताही गट-तट फूट नाही. पवारांच्या नेतृत्वात सगळे एक आहेत, पुढेही एक राहील. भविष्यातही कोणती फूट पडणार नाही. पवारांचा उत्तराधिकारी कोण, याबाबत कोणतंही दुमत होणार नाही. सर्वानुमते निर्णय होईल आणि सगळ्यांच्या पसंतीचा निर्णय होईल, असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं.