डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित आयोजित अभिवादन कार्यक्रमात रांगोळी, चित्रकला निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि मीरा उमप आणि संच यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

छत्रपती संभाजीनगर,१४ एप्रिल / प्रतिनिधी :-  भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-छत्रपती संभाजीनगर आणि शासकिय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, संगीत विभाग आणि जयंती उत्सव समिती, छत्रपती संभाजीनगरयांच्या संयुक्त विद्यमाने  १४ एप्रिल  (शुक्रवार) रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित आयोजित अभिवादन कार्यक्रमात रांगोळी, चित्रकला, निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि मीरा उमप आणि संच यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी, रामेश्श्वर रोडगे, शासकिय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, संगीत विभाग आणि जयंती उत्सव समिती, छत्रपती संभाजीनगरचे प्राचार्य, आर. एच. सातपुते, केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-छत्रपती संभाजीनगरचे प्रबंधक, संतोष देशमुख, Pre. IIS सेंटर च्या निदेशिका, डॉ. पंकजा वाघमारे आणि श्रीनिवास कन्स्ट्रक्शनचे संचालक, प्रदीप मोटरवार आदी उपस्थित होते.

सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले. यावेळी रामेश्श्वर रोडगे व आर. एच. सातपुते यांनी मर्गदर्शन केले. तसेच संतोष देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सुहासिनी गेडेकर यांनी सूत्रसंचालन केले तर माया वंजारी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमात केंद्र शासनाच्या पंजीकृत मिरा उमप आणि संच, छत्रपती संभाजीनगर तर्फे भीमगीत, देशभक्तीपर गीत व युवांसाठी प्रोत्साहन पर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रश्नमंजुषा, रांगोळी, चित्रकला आणि निबंध स्पर्धांच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली व अचूक उत्तर देणा-या विद्यार्थ्याना ‘संविधान’ बक्षिस म्हणून देण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-छत्रपती संभाजीनगरचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार, सहकारी प्रिती पवार, शरद सदिगले व प्रभात कुमार व शासकिय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापक व कर्मचारी आदींनी परीश्रम घेतले.