“विचार नसलेली वज्रमूठ…”केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांचा आरोप 

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेस प्रारंभ

छत्रपती संभाजीनगर,२  एप्रिल / प्रतिनिधी :-  स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर येथे भव्य स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेस प्रारंभ झाला. प्रचंड मोठ्या संख्येने जन सहभाग या यात्रेस लाभला. प्रखर राष्ट्रभक्त अशी ओळख असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत या विचारांचा प्रभाव आज या यात्रेत जनसहभागाच्या माध्यमातून बघावयास मिळाला.

या सभेवर बोलताना केंद्रीय मंत्री भागवत कराड म्हणाले की, “ही विचार नसलेली वज्रमूठ, फक्त भाजपच्या विरोधात आहेत. ती मुठ कधीही एकत्रित टिकू शकणार नाही.”

मंत्री भागवत कराड म्हणाले की, “एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे वीर सावरकरांचे कौतुक करतात, तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते हे सावरकरांवर टीका करतात, हा विरोधाभास आहे. यामुळे ही विचारांची वज्रमूठ नाही तर फक्त भाजपला विरोध करण्यासाठीची वज्रमूठ आहे.” असा हल्लाबोल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, सावरकर गौरव यात्रा ही ताकद दाखवण्यासाठी नाही तर त्यांच्या कामाला उजाळा देण्यासाठी आहे, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. “भारत मातेचे पूजन महाविकास आघाडीमध्ये अनपेक्षित आहे. शिवसेना ठाकरे गट भारत मातेचे पूजन करते, पणहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मान्य आहे का?” असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला.

कराड म्हणाले, सभेत होणाऱ्या टीकेला आम्ही डगमगणारे नाहीत. आम्ही त्याला लवकरच उत्तर देऊ. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सावरकरांचे कौतूक करतात आणि काँग्रेसचे नेते सावरकर यांच्यावर टीका करतात. हा विरोधाभास आहे. त्यामुळे ही वज्रमूठ नसून केवळ भाजपला विरोध करण्याची वज्रमूठ असल्याचे कराड यांनी सांगितले. गौरवयात्रा ताकद दाखवण्यासाठी नाही आमची गौरव यात्रा ताकद दाखवण्याची नाही. सावरकरांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आमची ही सावरकर गौरव यात्रा आहे. सभा आणि सावरकर गौरव यात्रा एका ठिकाणी येणे योगायोग आहे. ही महाविकास आघाडीची सभा संपूर्ण मराठवाड्याची असून, केवळ छत्रपती संभाजीनगरची नाही. पण आमची गौरव यात्रा फक्त एका मंडळाची आहे.

हे मान्य आहे का?

भारत मातेचं पूजन महाविकास आघाडीसाठी अनपेक्षित असले तरी आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तसेच शिवसेना गट भारत मातेचं पूजन करत आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हे मान्य आहे का?असा सवालही भागवत कराड यांनी उपस्थित केला.