अदानींच्या कंपनीतील २० हजार कोटी कोणाचे? थोरातांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर,२  एप्रिल / प्रतिनिधी :-  महाविकास आघाडीच्या वतीने आज वज्रमुठ सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

थोरात म्हणाले की, आम्ही कोऱोनाच्या अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यात नेतृत्वात राज्याचा विकास कमी होऊ दिला नाही. मात्र आताचं सरकार काय करत हे सांगायची गरज नाही. मात्र केंद्र सरकार विरोधात बोलणाऱ्यांमागे ईडी लावतं. सीबीआयची भीती दाखवतं.

दरम्यान राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देशात फिरले. राहुल गांधींनी सभागृहात प्रश्न विचारला. त्यावर त्यांना बोलू दिलं नाही. राहुलजी परदेशात गेले असताना त्यांच्यावर आरोप कऱण्यात आले. राहुलजींची सदस्यता काढून घेण्यात आले. त्यामुळे लोकशाहीची अवस्था काय आहे, न बोललेच बर, असंही थोरात म्हणाले.

राहुलजी यांनी एकच प्रश्न विचारला, की अदानींच्या खात्यात २० हजार कोटी रुपये कुठून आले, मात्र त्यावर उत्तर द्यायला सरकार तयार नाही. मात्र जनतेला सगळ कळायला लागलं आहे, असंही थोरात म्हणाले.

आज छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला उपस्थित राहून मराठवाड्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या सभेला मराठवाड्यातील जनतेचा लाभलेला प्रचंड प्रतिसाद पाहता आगामी काळ महाविकास महाआघाडीचाच आहे.

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. अवकाळी पाऊस वादळाने नुकसान झाल्यावर तातडीने मदत केली, आधार दिला. सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. कांद्याची खरेदी नाही शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पण विद्यमान सरकारला शेतकऱ्यांकडे पहायला वेळ नाही.

आज देशात कोणी बोलले तर घरी इडी येते. संविधानाला वाद विवाद मतांतरे मान्य आहेत. पण या केंद्र आणि राज्य सरकारला हे चालत नाही. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ अदानी बाबत 20 हजार कोटी कसे आले? हे विचारले तर खासदारकी काढून घेतली जात आहे.

सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे 38 खासदार विजयी होत आहेत. आपल्यावर जबाबदारी आहे. आपण एकत्र लढलो तर 180 पेक्षा जास्त जागा जिंकू. कर्नाटक मध्ये काँग्रेस सरकार येतेय. महाविकास आघाडीचा पॅटर्न राज्यांप्रमाणे देशात स्वीकारला जातोय आपण मिळून राज्यात आणि देशात परिवर्तन घडवू.