पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

मुंबई, दि. 31 : लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, प्रजेच्या सुखासाठी अहिल्यादेवींनी दानधर्माच्या माध्यमातून अनेक चांगली कामे केली. जी आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देत उभी आहेत. त्यांनी प्रजाहितदक्षतेचा प्रेरणादायी वारसा आपल्याला दिला आहे. अशा शौर्य, धैर्य, न्यायाच्या मुर्तीरूप अहिल्यादेवींना कोटी कोटी प्रणाम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *