संविधान विचार मंचकडून बाबासाहेबांना अनोखे अभिवादन

कोरोना बाधित रुग्णासाठी पौष्टिक जेवण   

उमरगा,१४ एप्रिल /प्रतिनिधी 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना , येथील संविधान विचार मंचच्या वतीने अनोख्या पद्धतीने अभिवादन केले .   

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी आंबेडकर जयंतीनिमित्त होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने, संविधान विचार मंचाकडून उपजिल्हा रुग्णालय व ईदगाह  कोविड केअर सेंटर मध्ये कोरोना बाधित रुग्णासाठी बुधवारी पौष्टिक जेवण देण्यात आले .     

संविधान विचार मंच,उमरगा वेगवेगळ्या उपक्रमातून नेहमीच  दिशादर्शक  काम करत असते. वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबवत असते.कोरोना काळात सामान्य जनतेला कोविड उपचारासाठी समर्पित सेवा दिल्याबद्दल,  उपजिल्हा रुग्णालय  तसेच समाजातील विविध घटकांच्या सहकार्यातून इदगाह कोवाड सेंटर उत्तम कार्य केल्याबद्दल  गौरव करण्यात आला. 

—————————————-  

कोरोना महामारीच्या काळात व दुसऱ्या लाटेतसुद्धा ईदगाह सेंटर ने माणुसकीच्या नात्याने ,कोरोना रुग्णाची उत्तम सेवा केली व अजून करीत आहेत . हे खुप मोठे सामाजीक कार्य निस्वार्थीपणे हि मंडळी करीत असल्याने आम्ही संविधान मंचाच्या वतीने छोटीशी आर्थिक मदत केले . या मागची भावना हीच आहे की समाजातील इतरांनी सुद्धा ईदगाहसेंटरच्या कार्यकर्त्याचे अनुकरण करावे  व कोरोना काळात रुग्णास मदत करावी

 –अशोक बनसोडे ,संविधान विचार मंच ,उमरगा   

—————————  

उपजिल्हा रुग्णालयात गेल्या वर्षभरात सातत्याने कोरोना रुग्णांना उपचार करण्यात आले होते. तर येथील ईदगाह सेंटरवर हिंदू – मुस्लिम युवकांनी व्हाटस गृपच्या माध्यमातून आर्थिक मद्त अतिशय उत्तमरीत्या कोरोना सेंटर चालविले . उत्तम  नाष्टा ,जेवण पाणी व निवासाची उत्तम सोय  करीत रुग्णाना मानसिक बळ दिले . यामुळे  समाजातील अनेक दात्यानी भरभरून  आर्थिक मद्त केली . कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुद्धा हे कोरोना कोविड सेंटर व्यवस्थित चालू असल्याने ,संविधान विचार मंचच्या वतीने पाच हजार रुपयांची देणगी दिली . यावेळी उमरगा डिबेट व उमरगाज   या  व्हाटस ग्रूपच्या जाहेद मुल्ला,मनीष सोनी,कलिम पठाण ,खाजा मुजावर,अझहर ,फैजल व नारायण गोस्वामी यांचा सन्मान करण्यात आला . तर येथील आरोग्य कर्मचारी तोळनुरे ,हुळमजगे ,थोरात यांचाही सन्मान करण्यात आला .