भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून अभिवादन

लातूर,१४ एप्रिल /प्रतिनिधी 
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी (दि.१४) सकाळी लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास कोविड १९ प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर नियमावलीचे पालन करीत मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर बौद्ध भिक्कु पय्यानंद यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करून त्रिशरण आणि पंचशील झाले. दरम्यान यावेळी पालकमंत्र्यांनी सर्व भीम भक्त अनुयायांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.

Displaying 1 (5).JPG


यावेळी बोलताना सरकारकडून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्बंधाचे पालन सार्वजनिक जयंती उत्सव समिती कडून पुरेपूर करण्यात आले. संविधानाला जपणे, सुरक्षित ठेवणे आणि आंबेडकरी विचारांचा वारसा जपणे हे आज याठिकाणी अनुभवायला आले आहे. यातून उपस्थित प्रत्येकात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन होते आहे असे सांगून सर्वानी कोविड १९ प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर आवश्यक नियमावलीचे पालन करीत आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी केले.
या प्रसंगी बौद्ध भिक्कु पय्यानंद, महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन हरिश्चंद्र शिरसाट, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव, ॲड. व्यंकट बेद्रे, हरिभाऊ गायकवाड, कैलास कांबळे, लक्ष्मण कांबळे, केशव कांबळे, नवनाथ आल्टे, मोहन माने, मोहन सूरवसे, अर्चनाताई आलटे, प्रवीण कांबळे, रणधीर सूरवसे, लाला सूरवसे, यशपाल कांबळे, पंकज काटे, रघुनाथ बनसोडे, राहुल कांबळे, बसवंतअप्पा उबाळे, महेश काळे, संजय सोनकांबळे, राजू गवळी, संजय ओहोळ, अशोक देडे, राहुल डुमने, प्रवीण सूर्यवंशी, सचिन बंडापल्ले, सिकंदर पटेल, आनंद वैरागे, राज क्षीरसागर यांच्यासह सार्वजनिक जयंती उत्सव समिती पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.