वैजापूर पालिकेचे नगरसेवक शैलेश चव्हाण यांना पितृशोक

वैजापूर,२४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- येथील माजी सैनिक मुकींदराव माधवराव चव्हाण (वय 60 वर्ष) यांचे शनिवारी (ता.24) सायंकाळी सहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वैजापूर पालिकेतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक शैलेश चव्हाण यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. रविवारी (ता.25) सकाळी 10.30 वाजता त्यांच्या राहत्या गावी धोत्रा (ता.कोपरगाव) येथे अंत्यविधी होणार आहे.