वैजापूर येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

वैजापूर ,६ जून  /प्रतिनिधी :-हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा वैजापुरात सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आनंद व उत्साहात झाला.

छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवराज्याभिषेक सोहळा दिनाचा विजय असो अशा जयघोषात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जलाभिषेक, दुग्धभिषेक करण्यात आला.भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, शिवसेना तालुका प्रमुख सचिन पाटील वाणी, शहराध्यक्ष राजेंद्र पाटील साळुंके, अमोल बोरणारे, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, महेंद्र काटकर यांनी राजांच्या पुतळ्याला जलाभिषेक केला.

याप्रसंगी प्रशांत कंगले, काशिनाथशेठ गायकवाड, प्रेम राजपूत, दिनेश राजपूत,  सुनील गायकवाड, संतोष वाघ, डॉ.परेश भोपळे, श्याम साळुंके, कैलास वाणी, बंटीमगर, रामकीसन जोरे, शिक्षक बाबासाहेब गायकवाड, श्रीराम निकम, काशीराम राजपूत, वसंत त्रिभुवन,  ज्ञानेश्वर टेके, राजेश गायकवाड, आशिष भाटिया, देवा भाटिया, रमेश त्रिभुवन, दाढे पाटील सहभाग घेतला.अमोल बोरणारे व बंटी मगर यांनी सदर कार्यक्रम घडवून आणण्यासाठी परिश्रम घेतले.