वैजापूर पालिकेचे सेवानिवृत्त स्वछता निरीक्षक जगन्नाथ अनर्थे यांचे निधन

वैजापूर,४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-येथील नगर पालिकेचे सेवानिवृत्त स्वच्छता निरीक्षक जगन्नाथ बाळाजी अनर्थे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 86 व्या वर्षी सोमवारी (ता.03) रात्री निधन झाले. मंगळवारी (ता.4) सकाळी त्यांच्या पार्थिवावर  अमरधाममध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात सहा विवाहित मुली, एक विवाहित मुलगा, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

वर्धमान पतसंस्थेचे वसुली अधिकारी ज्ञानेश्वर अनर्थे  यांचे ते वडील होत. आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, डॉ.दिनेश परदेशी, सचिन वाणी, ज्ञानेश्वर टेके, अशोक कोठारी,धोंडिरामसिंह राजपुत, राजेंद्र संचेती, राजेंद्र साळुंके,लिमेश वाणी,देविदास वाणी,हरीश पालेजा, सुधीर लालसरे, राजेंद्र लालसरे, आर.पी.क्षीरसागर, घनश्याम वाणी, गुलाबराव साळुंके यांनी श्रद्धांजली अर्पण केली.