वैजापूर शहरासह ग्रामीण भागात परतीच्या पावसाने झोडपले ; पिकांचे नुकसान

गोदावरीच्या पाणी पातळीत 40 फुटापर्यंत वाढ 

वैजापूर,२१ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर शहरासह ग्रामीण भागात परतीचे पाऊसाने गावाना गुरुवारी पहाटे चांगलेच जोरदारपणे झोडपून काढले. तसेच काही गावात अतिवृष्टी तडाखा बसल्याने त्या भागातील शेतक-यांचे खरीप हंगामाचे काढणीचे स्थितीतील शेत पिकांचे प्रचंड नासाडी  झाल्याचे संकट दिवाळीचे सणाचे तोंडावर ओढवले.

नाशिक -नगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्या मुळे गोदावरी नदी पात्राची पाणी पातळी 30 ते 40 फुटापर्यंत वाढ झाली आहे.त्यामुळे वैजापूर तालुक्याचा शेजारच्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहाता या तालुक्याशी संपर्क तुटल्याची महिती समोर आली आहे. डोणगाव ता.वैजापूर येथून पुणतांबा केटीवेअर सिमेंट रस्ता पाण्यात बुडाल्यामुळे वाहतूक बंद पडली तसेच बाजाठाण – चेंडूफळ येथून श्रीरामपूरला जोडणारा कमलपूरचा वाहतूक पुल पाण्याखाली गेल्याने याठिकाणी रहदारी विस्कळीत झाली आहे.वाहनधारकांना श्रीरामपूरला जाण्यासाठी नाऊर पुलावरुन जाण्याचा पर्यायी मार्ग तुर्तास सुरळीत आहे. दरम्यान दोन तालुक्याचा संपर्क मार्ग तुटल्यामुळे त्याचा फटका 20 ते 25 गावांना बसला आहे. सलग दोन दिवसा पासून तालुका भरात परतीचे पाऊसाने धुमाकूळ घातला आहे. बुधवारी तालुक्यातील दहा महसुली मंडळात जेमेतेम स्वरुपात पाऊस कोसळला होता.मात्र गुरुवारी पहाटे साखर झोपेत पाऊसाने ग्रामीण भागाला चांगलेच ओलेचिंब करुन टाकले होते. जवळपास दीड ते दोन तास जोरदार सरी कोसळल्यामुळे कापूस मका तसेच उन्हाळ कांद्या लागवडीसाठी टाकलेल्या रोपावर परतीचे पाऊसाने नुकसानीचे नांगर फिरवल्यामुळे शेतक-यांचे चेहरे पांढरेफटक पडले आहेत. वैजापूर , लासूरगाव , महालगाव या महसूल मंडळांत पाऊसाने मोठा कहर केला आहे.तालुका प्रशासनाने सर्वच महसूल मंडळातील पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक महिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.