वैजापूर शहरात २ कोटी २५​ लाख रुपये निधीच्या विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण

वैजापूर ,१० मे  / प्रतिनिधी :- राज्य सरकारच्या नगरविकास विभागाअंतर्गत वैशिष्ट्येपूर्ण योजनेतून वैजापूर शहराच्या विविध विकासकामांसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत मंजूर झाला असून या निधीतून म्हसोबा चौक ते जैन कॉलनी रस्ता डांबरीकरण १ कोटी रुपये, चंद्रपाल नगर कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण ७५ लाख रुपये, वॉल कंपाऊंड ४० लाख रुपये, पेव्हर ब्लॉक १० लाख रुपये असे एकूण २ कोटी २५ लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. ​

‌या प्रसंगी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरभाई, भाजप शहरप्रमुख दिनेशसिंह राजपूत, सुरेश तांबे, नगसेवक दशरथ बनकर, सुप्रिया व्यवहारे, प्रिती भोपळे, अनिता तांबे, गोकुळ भुजबळ, स्वप्नील जेजुरकर, इम्रान कुरेशी, गणेश खैरे, बिलाल सौदागर, पारस घाटे, युवासेना तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, शहरप्रमुख श्रीकांत साळुंके, उपतालुकाप्रमुख महेश बुणगे, प्रकाश

 मतसागर, रावसाहेब मोटे, बाजर समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन, विठ्ठल पगार, संजय बोरणारे, रणजित चव्हाण, उपशहरप्रमुख बाळासाहेब सुतवणे, संदीप बोर्डे, कमलेश आंबेकर, हेमंत संचेती, धनंजय अभंग, भावलाल सोमासे, शैलेश पोंदे, अमोल बोरणारे, जितेंद्र चव्हाण, संतोष बंगाळ, गौरव दोडे, राजवीर त्रिभुवन आदी उपस्थित होते.