वांजरगाव येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जलकुंभ व पाईप लाईनचे भूमीपूजन

वैजापूर,२४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघासाठी पाणीपुरवठा विभागाकडुन जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 30 कोटी 30 लाख 41 हजार रुपयांचा निधी आ. रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला असून या निधीपैकी मंजुर करून आणलेल्या निधीपैकी वांजरगाव येथे 34 लाख रुपये निधीच्या जलकुंभ व पाईपलाईन कामाचे भूमीपूजन आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता.24) माजी नगराध्यक्ष साबेर खान अमजदखान यांच्या हस्ते शनिवारी झाले.   

याप्रसंगी आ. रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप यांची समयोचित भाषणे झाली.

माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, कैलास सुरासे, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, उपतालुकाप्रमुख कल्याण पाटील जगताप, महेश पाटील बुनगे, विभागप्रमुख नानासाहेब पाटील थोरात, संजय पाटील बोरनारे, उद्धव पाटील बहिरट, सतिश खंडांगळे, सदाशिव निर्मळ, रामभाऊ बारसे, भगवान चौधरी, शरद जाधव, एकनाथ खटाणे, सरपंच किशोर कोळेकर, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर गागरे, पोलीस पाटील सचिन मदने, ज्येष्ठ शिवसैनिक हरीभाऊ गागरे, शाखाप्रमुख गोरख कोळेकर, जफर पटेल, अशोक गागरे, विठ्ठल कासार, संजय नांगळ, वसंत वाकळे, दत्तात्रय शिंदे, लक्ष्मण वाकळे, अर्जुन शिंदे, मोहन होन, दत्तात्रय गागरे, संजय गागरे, नानासाहेब गागरे, गोटूसिंग राजपूत, नवनाथ कोळेकर, भागीनाथ पोटे, गणेश पवार, राकेश कोळेकर, सोन्याबापू शिंदे,चंद्रकांत नांगळ, तुकाराम गागरे, अजहर पठाण, जमशेद सय्यद, जावेद सय्यद, मुजाहि्द सय्यद, रहेमान सय्यद, अशोक लहीरे, अरविंद लहीरे, राधुकाका लहिरे, गोरख त्रिभुवन, ज्ञानेश्वर त्रिभुवन, काशिनाथ साळवे, वसंत साळवे, हरिभाऊ साळवे, गणेश पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.