वैजापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

वैजापूर ,१४ एप्रिल  / प्रतिनिधी :- भारतीय संविधानाचे जनक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आली. 

डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण व त्या जवळ असलेले भारतीय संविधानच्या पहिल्या पानावरील उद्देशिकेचा हिंदी आणि इंग्रजीत उतारा व पुतळ्याभोवती मनाला भावणारी सजावट हे सर्व म्हणजे डॉ. आंबेडकर यांच्या जयंती दिनाला सण व उत्सवाचे आनंददायी स्वरूप असे वातावरण निर्माण झाले होते. या दिनाचे औचित्य साधत आ. रमेश पाटील बोरणारे पालिकेच्या नगराध्यक्ष शिल्पाताई  परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, मुख्याधिकारी भागवत बिघोत, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या स्वच्छता विभागाच्यावतीने स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे, सहायक रमेश त्रिभुवन व स्वच्छता दूत धोंडीरामसिंह राजपूत यांनी सकाळी सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार टाकून  स्वच्छतेला आरंभ केला.

येथील सायकलिस्ट व स्वीमिंग ग्रुपचे जयराम खाडे, बाबासाहेब जगताप, दिलीप अनर्थे व सर्व सायकलिस्ट व स्वीमिंग ग्रुपने पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व ‘सायकल चालवा-आयुष्य वाढवा’ आरोग्य हीच संपत्ती, ‘झाडे लावा झाडे’ ‘जगवा माझी ‘वसुंधरा मी वसुंधरेचा’ हे संदेश देत खंडाळा गावापर्यंत रॅली काढली या रॅली ला धोंडीराम राजपूत यानी ध्वज दाखविला व “शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ स्वच्छता पाळा, संविधान वाचन करा हा संदेश दिला. या प्रसंगी भीमाशंकर तांबे, श्री.वारकर,लक्ष्मण देवरे, डॉ,थोरात, डॉ, जगताप, शौर्य गाढे, सोहम घुमरे,     प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते.