चार राज्यात भाजपचा विजय ; वैजापुरात भाजप कार्यकर्त्यांचा रॅली काढून जल्लोष

वैजापूर ,११ मार्च / प्रतिनिधी :- चार राज्यातील निवडणुकांत भाजपने विजय मिळविल्याबद्दल गुरुवारी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यानी शहरातून विजयी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला.

वैजापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जल्लोष करण्यात आला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी यांच्या निवासस्थानासमोर एकत्र येवून ढोल-ताशांच्या गजरात फटाक्याची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शहरातून विजयी रॅली काढण्यात आली.  
या विजयी रॅलीत नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, माजी उपनगराध्यक्ष मजीद कुरेशी, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, नगरसेवक दशरथ बनकर, शैलेश चव्हाण, राजूसिंग राजपूत, बजरंग मगर, राजेश गायकवाड, गणेश खैरे,  प्रशांत कगले , सूर्यकांत सोमवंशी, जाकीर कुरैशी, गौरव दौडे, सागर राजपुत, किरण व्यवहारे, महेश भालेराव, प्रदीप चव्हाण, संदीप पवार, शैलेश पोंदे, विनय संचेती, इस्माईल पटेल तसेच महिला पदाधिकारी जयमाला वाघ, नगरसेविका जयश्री दिनेश राजपूत, अनिता तांबे, मनीषा मुंडे , सविता पुणे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.