तुम्ही तुमचे कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलंच आहे – राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छापत्र!

May be an image of 5 people, people standing and indoor

मुंबई : “तुम्ही तुमचे कर्तृत्व महाराष्ट्रासमोर सिद्ध केलंत, देशाच्या भल्यासाठी तुम्हांला अधिक काम करण्याची संधी मिळो” अशा शब्दांत शुभेच्छा देत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरेंनी एका खास पत्राद्वारे फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपण मुख्यमंत्री म्हणूनच याल अशी अपेक्षा होती पण ते झाले नाही अशा भावना राज यांनी पत्रात व्यक्त केल्या आहेत.

Image

यापुढे पत्रात त्यांनी पक्षाचा आदेश मानून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले याबद्दल त्यांचे अभिमानदं केले आहे. फडणवीसांनी आपल्या या वर्तनातून राज्यातील सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासमोर आदर्श ठेवला आहे अशी मार्मिक टिपण्णी करत राज यांनी फडणवीस यांनी केलेल्या त्यागाचे कौतुक केले, आणि फडणवीसांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.