खा.संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते सफियाबादवाडी येथे संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

Displaying IMG-20211214-WA0239.jpg

वैजापूर,१४ डिसेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील सफियाबादवाडी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खा.संभाजीराजे भोसले यांच्याहस्ते शनिवारी झाले. सिंहनादे प्रतिष्ठानच्या पुढाकाराने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे अनावरण तसेच वैजापूर शहरात लाभेश साठे या तरुणाने नव्यानेच सुरू केलेल्या खादी भांडारचे उदघाटन करून मुरारी पार्क भागातील नागरिकांशी त्यांनी सवांद साधला. 

Displaying IMG-20211214-WA0237.jpg


शिवरायांचे मराठा साम्राज्य म्हणजे अठरापगड जाती व आलुतेदार- बलुतेदारांना एकत्र बांधून उभारलेले साम्राज्य होते. हे साम्राज्य राजाराम महाराज व  ताराराणी यांनी पुढे नेले या महापुरुषांचे विचार प्रसाराचे हे स्मारक ठरावे असे प्रतिपादन खा.संभाजीराजे भोसले यांनी सफियाबादवाडी येथे संभाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरणप्रसंगी केले.

सिंहनादे प्रतिष्ठाणचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.वैजापूर शहरातील मुरारी भागातील नागरिकांशी संवाद  साधल्यानंतर खा.भोसले व भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांची विविध विषयांवर चर्चा झाली.

Displaying FB_IMG_1639470945312.jpg

भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील बोडखे, सोमनाथ मगर, ज्ञानेश्वर शिरसाठ, सुनील गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.