वैजापुरात सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

वैजापूर ,११ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर शहरात सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. येथील महात्मा फुले पुतळा परिसरात वैजापूर शहरातील सर्व थरातील नागरिकांनी गुरुवारी एकत्र येऊन ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सर्वप्रथम माळी समाजाच्या जेष्ठ नागरिक सीताबाई गायकवाड, नगरसेविका माधुरी बनकर, सुलभा भोपळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला नगरसेवक दशरथ बनकर, स्वप्नील जेजुरकर, दिनेश राजपूत,राजेश गायकवाड यांनी व समता परिषदेचे बाबासाहेब शिंदे,आबा जेजुरकर,जगन गायकवाड, महेश भालेराव ,गौतम गायकवाड, शशिकांत भालेराव, बाबासाहेब गायकवाड, धोंडीरामसिह राजपूत,-सलीम तांबोळी,रतीलाल गायकवाड, शोभा गायकवाड, वैशाली गायकवाड, शीतल गायकवाड, दिलीप अनर्थे,अण्णासाहेब ठेंगडे, शैलेश ननवरे, श्रीमती पवार, शोभा बनकर आदींनी अभिवादन केले. धोंडिरामसिंह राजपूत यांनी संचलन केले.जगन गायकवाड व गौतम गायकवाड यांनी आभार मानले.याप्रसंगी शहरातील सर्व थरातील नागरिक महिला व पुरुष उपस्थित होते.