नगर परिषद कर भरुन विकासाला चालना द्या -ॲड. महेश धन्नावत

जालना ,११ मार्च / प्रतिनिधी :- मागील दोन वर्षांपासून कोरोनाकाळ पाहून नगर परिषद जालना यांनी नगर परिषद कर वसुली सक्तीची केलेली नव्हती. मात्र कोरोना काळात लोकांना त्रास होऊ नये यासाठी अनेक सुविधा तथा उपयोजना देण्यात आल्या व सर्व कर्मचारी या कामात व्यस्त होते. आता शहराच्या विकासासाठी नगर परिषद कर भरणे गरजेचे आहे.

ॲड.महेश सिताराम धन्नावत यांनी नगर परिषद कर वसुली अधिकारी तेजेंद्र शरदराज मेहरा यांच्या विनंतीवरून त्वरीत स्वतःच्या घराचा कर बाबत धनादेश दिला व त्यांच्या विनंतीवरून सर्वांना हे आवाहन सुद्धा केले की, नगर परिषद कर वेळेवर भरुन व येणारे कर वसुली अधिकाऱ्यांना सहकार्य करावे व विरेंद्र धोका, मनिष तवरावाला, सतीष तवरावाला, सुभाष देविदान, नगरसेवक जगदीश भरतिया, आमदार कैलास गोरंट्याल,  माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल,माजी विरोधीपक्ष नेते भास्करराव आंबेकर यांचे मार्गदर्शन घेऊन अग्रवाल समाजातील लोकांनी व इतरांनी त्वरीत नगर परिषद कर भरावा यासाठी मोहीम घेण्यात येईल, असे आश्वासन सुद्धा दिले.