मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसेतर्फे नांदूरढोक येथे विद्यार्थ्यांना मराठी साहित्य वाटप

वैजापूर ,४ मार्च / प्रतिनिधी :- मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैजापूर आणि नांदुरढोकचे (ता. वैजापूर) सरपंच संतोष घंगाळे यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळा नांदूर ढोक येथे विद्यार्थी आणि मान्यवर यांना मराठी साहित्य वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाळासाहेब शिंदे होते. मनसे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील घंगाळे, पंचायत समिती सदस्य विनायक पाटील गाडे, योगेश घंगाळे, डॉ गणेश अग्रवाल, डॉ अमोल कंताकटले, डॉ. मंजुश्री कंताकटले, सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती पाबळे, दिलीप बाजारे, मनसे तालुका उपाध्यक्ष नंदू हिरडे, गोकुळ वराडे, डॉ.प्रसाद घंगाळे, विलास बिलवरे, रेणुका माता बचत गटाच्या उज्वला बिलवरे, लक्ष्मी घंगाळे, रंजना घंगाळे, भास्कर शिंदे, बाळकृष्ण गायकवाड, योगेश बिलवरे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.