पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती द्या-पालकमंत्री संदीपान भुमरे

छत्रपती संभाजीनगर,१३  एप्रिल / प्रतिनिधी :-  छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती द्या असे प्रतिपादन पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी स्मार्ट सिटी कार्यालय येथे आयोजित महानगरपालिका आढावा बैठकीत केले.

सध्या संथ गतीने सुरू असलेल्या शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देऊन लवकरात लवकर ही योजना राबविण्यात यावी असे कडक निर्देश त्यांनी संबंधित महाराष्ट जीवन प्राधिकरण व कंत्राटदार यांना दिले .तसेच या उन्हाळ्यात महानगरपालिकेने नागरिकांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी प्रशासक यांनी मंत्री महोदय यांना पाणी पुरवठा योजने संदर्भात सविस्तर माहिती दिली. तसेच महानगरपालिकेच्या वतीने उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याची कमतरता भासू नये याकरिता करण्यात येणाऱ्या उपाय योजने बाबत माहिती दिली.

यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल, प्रशासक अभिजीत चौधरी ,अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील,एम जी पी चे लोलापोड, स्मार्ट सिटी उप मुख्यकार्यकारी अधिकारी सौरभ जोशी,शहर अभियंता ए बी देशमुख,एम बी काझी,मुख्य लेखाधिकारी संतोष वाहूळे,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा ,प्रादेशिक परिवहन अधिकारी मेत्रेवार, विभाग प्रमुख ,अधिकारी उपस्थित होते.