हिंसाचारावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे- फडणवीस सरकारवर केली टीका

मुंबई,३१ मार्च  /प्रतिनिधी :-छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचारावरून पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. “महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये २ एप्रिलला महाविकास आघाडीची सभा होत असून ही होऊ नये म्हणून कारस्थान केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

रामनवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचारावरून सध्या राज्यातले राजकारण चांगलेच तापले आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात बोलताना प्रक्षोभक विधाने करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही नेते करत असल्याची टीकादेखील केली होती. मात्र, तरीही आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली. “हा हिंसाचार सरकार पुरस्कृत असून शिंदे-फडणवीस सरकार हे काही लोकांना दंगलीसाठी प्रोत्साहन देत आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला.

“२ एप्रिलला  छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे, ही सभा होऊ नये, यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. सध्या वातावरण तणावपूर्ण, भडका उडू शकतो, हे कारण पुढे करुन मविआच्या सभेला परवानगी नाकारली जाऊ शकते,” असा दावा त्यांनी केला. “यापूर्वी रामनवमीच्या मिरवणुकांवर कधीही हल्ले झाले नाहीत. गुढीपाडव्याच्या शोभायात्रांवेळीही असा प्रकार घडला नव्हता. पण उद्धव ठाकरेंच्या सभांना खेड आणि मालेगावमध्ये मिळणारा प्रतिसाद पाहून या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे काही लोकांना हाताशी पकडून वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न होत आहेत.” अशी टीका संजय राऊतांनी केली.

शांतता आणि शिस्तीत महाविकास आघाडीची सभा पार पडेल – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

प्रमुख पदाधिकारी यांनी घेतली मैदानावर बैठक

छत्रपती संभाजीनगर,३१ मार्च  / प्रतिनिधी :-   २ एप्रिल रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. सर्वसामान्य नागरिक या सभेला मोठ्या संख्येने येणार असल्याचे पाहून सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे शहरात असंवेदनशील वातावरण निर्माण केले जाते. मात्र शिवसैनिक आणि नागरिक अफवाना बळी पडत नाही. शांतता आणि शिस्तीत महाविकास आघाडीची सभा पार पडेल, असा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.

IMG-20230331-WA0060.jpg

प्रशासन आणि प्रमुख पदाधिकारी यांनी सभा मैदानावर आढावा घेऊन नियोजन बैठक घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले की, सर्वांनी सतर्क राहून, अफवा आणि वातावरण खराब करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवावे. तात्काळ पोलीस आणि पदाधिकारी यांना माहिती द्यावी. सभा यशस्वी होणारच असा विश्वास त्यांनी वक्त केला. संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

या बैठकीस माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक,बाप्पा दळवी, गणू पांडे, अनिल पोलकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड,  महिला आघाडीच्या सहसंपर्क संघटक सुनीता देव, माजी महापौर जिल्हा समनव्यक कला ओझा, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, उपजिल्हासंघटक नलिनी बाहेती, अनिता मंत्री, जयश्री लुंगारे, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, शहर संघटक आशा दातर, भागूबाई शिरसाठ, विद्या अग्निहोत्री, शिव अंगणवाडी सेनेच्या मंजुषा नागरे, रेणुका जोशी, वनमाला पटेल झ किरण शर्मा, पद्मा तुपे, कविता सुरळे, सविता निघूळे, उपशहरप्रमुख अनिल जैस्वाल, किशोर कच्छवाह, राजू दानवे, दिग्विजय शेरखाने, संजय हरणे, शिवा लुंगारे, बाळासाहेब गडवे, संतोष खेडके, हिरा सलामपुरे, लक्ष्मीनारायण बाखरिया, सीताराम सुरे, बंटी जैस्वाल, छोटू घाडगे, नंदू लबडे, अभिजित पगारे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.