जलतरण व सायकल ग्रूप वैजापूरतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

वैजापूर ,१४ एप्रिल  / प्रतिनिधी :-संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने जलतरण व सायकल ग्रुप वैजापूर यांच्यावतीने अगदी सकाळ प्रहरी पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत व सर्व जलतरण व सायकल परिवार सदस्य यांच्यावतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने वैजापूर ते खंडाळा अशी सायकल रॕली काढून स्वच्छ व हरित वैजापूर करण्यासाठी सायकल चालवा असा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी भीमाशंकर तांबे व धोंडीरामसिंह राजपूत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी योगेश गाढे, शिवाजी भसाळे, नामदेव चोरे , जयराम खाडे, कमलेश अधिकार, काशिनाथ गावित, योगेश गवळी, योगेश कुंदे, चरणसिंग काकरवाल, मेजर मस्के, बी.आर. वारकर, प्रशांत गायकवाड, प्रविण म्हस्के, गंगाराम घुमरे, लक्ष्मण देवरे, सचिन लाडवाणी, दिलीप अनर्थे, महेश अनर्थे, अशोक तांबूस आप्पा, करंकाळ सर, डॉ. थोरात, डॉ. जगताप आदी उपस्थित होते