वैजापूर शहरात केंद्रीय मंत्री डॉ.कराड यांच्या उपस्थितीत सावरकर गौरव यात्रा

वैजापूर ,१४ एप्रिल  / प्रतिनिधी :- वैजापूर शहरातुन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर गौरव यात्रा काढण्यात आली. भारतीय जनता पक्ष, तालुका शाखा व बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांच्यातर्फे गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
डेपो रस्त्यावरील संभाजी चौकापासून केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, आमदार रमेश पाटील बोरणारे, नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, माजी नगराध्यक्ष साबर खान, भाजपाच्या राज्य कार्यकारिणीचे एकनाथ जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे, अल्पसंख्यांक सेलचे नबी पटेल, बाबासाहेब जगताप, ज्ञानेश्वर जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव यात्रेस सुरुवात झाली.
डॉ.‌बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्टेशन रस्त्यावर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.‌ स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गीत सादर करत यात्रेचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक कचरु पाटील डिके, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, राजेंद्र साळुंके, दिनेश राजपूत, पारस घाटे, गणेश खैरे, शैलेश पोंदे, प्रशांत कंगले, प्रभाकर गुंजाळ, नितिन जोशी यांच्यासह सेना-भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.