शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभेला वैजापूर- गंगापूर मतदारसंघातून दहा हजार कार्यकर्ते जाणार – आ. रमेश पाटील बोरणारे

वैजापूर ,७ जून  /प्रतिनिधी :-शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची  विराट सभा बुधवारी (ता.8) औरंगाबाद येथे होणार आहे. शिवसेना शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त ही सभा आयोजित करण्यात आली असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेला वैजापूर – गंगापूर विधानसभा मतदारसंघातून जवळपास दहा हजार कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती आ.रमेश पाटील बोरणारे यांनी दिली.

शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे निमंत्रण घरोघरी जाऊन देण्यात आले आहे तसेच शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी सभेचे भव्य होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्या हिंदुत्वाचा गगनभेदी हुंकार घुमणार असून, देव, देश आणि धर्मासाठी प्रत्येकाने या सभेला यायलाच हवे असे आवाहन आ. बोरणारे यांनी केले आहे. 

शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष साबेर खान, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, माजी तालुकाप्रमुख खुशालसिंह राजपूत, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, माजी जिल्हापरिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, शिवसेनेचे उपतालुकप्रमुख कल्याण पाटील जगताप, मोहनराव साळुंके, संजय पाटील बोरणारे, रणजित चव्हाण, महेश पाटील बुणगे, सलीम वैजापुरी, खलील मिस्तरी, नगरसेवक प्रकाश चव्हाण, भाऊसाहेब पाटील गलांडे, वसंत त्रिभुवन, कमलेश आंबेकर, शिवसेना महिला आघाडीच्या सुलभाताई भोपळे, पद्माताई साळुंके, लता पगारे आदी या सभेच्या तयारीसाठी मेहनत घेत आहे.