हमरापूर शिवारात गोदावरी पात्रात 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला

वैजापूर,१८ जुलै /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील हमरापुर शिवारात गोदावरी नदीच्या पात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही घटना शनिवारी उघडकीस आली.

या घटनेबाबत नागरिकांनी  अवलगावचे पोलिस पाटील सखाहरी मोरे यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने विरगाव पोलिस स्टेशनला कळल्यानंतर एपीआय शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नवनाथ कदम, पोलिस अंमलदार विजय बामंदे, प्रवीण अभंग, गुणवंत थोरात यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत व्यक्तीचे वजन वय. अंदाजे 40 ते 45 वर्षे असून त्याच्या डाव्या हातात लोखंडी कडे व हातावर ओम असे गोंदलेले आहे. याप्रकरणी विरगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.