वैजापुरात अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन : व्यसन करण्याची संकल्प प्रतिज्ञा

वैजापूर ,१८ जुलै /प्रतिनिधी :-जनसमान्यांचे कैवारी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेयांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी शहरातील  विविध भागात महात्मा फुले नगर (मोंढा मार्केट ) येथे त्यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

युवा लहुजी प्रतिष्ठाण महात्मा फुले नगर मोंढा मार्केट  वैजापूर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.भाजपचे नगरसेवक दशरथ बनकर, पालिकेतील शिवसेना गटनेते प्रकाश चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष हाजी अकील सेठ, नगरसेवक गणेश खैरे, शैलेश चव्हाण, राजेश गायकवाड, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, वसंत त्रिभुवन, बबन त्रिभुवन, स्वप्नील जेजुरकर, मधुकर त्रिभुवन, भागीनाथ त्रिभुवन, धोंडीरामसिंह राजपूत, शैलेश पोंदे,गिरीश चापानेरकर, राजेंद्र लालसरे, विलास म्हस्के, साहेबराव पडवळ, ज्ञानेश्वर सिरसाट यांनी ही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवा थोरात, रुद्रा शेजवळ, रवी पगारे, अविनाश त्रिभुवन,किशोर सोळसे, सुनील त्रिभुवन व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.