वैजापूर तालुक्यातील सुराळा येथे १ कोटी ३८ लक्ष निधीच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण

वैजापूर ,१४ एप्रिल  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील सुराळा येथे विविध विकास कामांसाठी १ कोटी ३८ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला असून या निधीतून विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहे. या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा शुक्रवारी आ. रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते पार पडला.

जलजीवन कामांचे ५६ लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन,सुराळा ते भग्गाव रस्ता ५७ लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन,हाजी सहाब बाबा दर्गा सभामंडप १५ लक्ष रुपये कामांचे लोकार्पण,दलित वस्ती सामाजिक सभागृह १० लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन अशा एकुण १ कोटी ३८ लक्ष रुपये या मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण यावेळी करण्यात आले.

या प्रसंगी शिवसेना ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष साबेरभाई, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रामहरी बापू जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र साळुंके,खरेदी विक्री संघाचे चेअरमन साहेबराव पाटील औताडे, शहरप्रमुख पारस घाटे, उपतालुकाप्रमुख कल्याण पाटील जगताप, रावसाहेब पाटील मोटे, विभागप्रमुख बंडू पाटील जगताप, नानासाहेब पाटील थोरात, उपविभागप्रमुख सुनील कारभार, बंडू पाटील गायकवाड, विजय काळे, युवासेना तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आ.बोरणारे व मा.नगराध्यक्ष साबेर खान यांची यावेळी भाषणे झाली.  राज्य सरकारकडून तालुक्यातील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे आ.रमेश बोरणारे म्हणाले.

कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी सिताराम पाटील वैद्य, संभाजी जगताप, बापू भैय्या साळुंके, काकासाहेब गोरे, शिवाजी गोरे, शासकीय गुत्तेदार भिकन लहामगे, राजेश कदम, शंकर मुळे, भगगांवचे सरपंच अशोक  जगताप, बेलगाव सरपंच संजय गडाख, मनोज काळे, किरण तांबे, उद्धव बहिरट, योगेश गायकवाड, भीमराज जाधव, वाल्मीक जगताप, गोपीनाथ गायकवाड, मधुकर चंदणे, बाळासाहेब चेळेकर, राहुल लांडे, प्रभाकर मते, छगन सावंत, तुकाराम न्हावले, संदीप मोटे, विठ्ठल तुरकणे, नंदुभाऊ गायकवाड, शरद जाधव, रामकृष्ण आहेर, संतोष बंगाळ, राहुल शेळके, अक्षय गायकवाड, मयुरेश जाधव, सिकंदर भाई, संजू  गायकवाड, ज्ञानेश्वर शेटे, जगन्नाथ आहेर, रामेश्वर तांदळे, बाबू नाना तांदळे, शिवाजी पवार, निजाम भाई सय्यद, फारुक भाई, अशपाक भाई, मिलिंद त्रिभुवन, राहुल गायकवाड, समीर भाई, नासीर भाई, रमेश गायकवाड, बद्रीनाथ तांदळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.