जागतिक हृदय दिनानिमित्त वैजापूर पालिकेच्या भगवान महावीर रुग्णालयात नागरिकांची तपासणी व मार्गदर्शन

वैजापूर,२९ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- जागतिक हृदय दिनानिमित्त वैजापूर पालिकेच्या भगवान महावीर रुग्णालयात गुरुवारी (ता.29)  शहरातील नागरिकांची हृदय तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता निकाळे यांनी केली व हृदयाची काळजी ,आहार, प्राणायाम व व्यायामाबाबत उपस्थित नागरिकांना माहिती दिली.

फळ, फळावर व भाजीपाला जास्त प्रमाणात घेण्याचा सल्ला ही डॉ.निकाळे यांनी दिला. यावेळी जेष्ठ नागरिक व जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडिरामसिंह राजपूत यांनीही आपली हृदय व रक्तदाब तपासणी करून घेतली.  रुग्णालयाच्या मुख्य परिचारिका निर्मला जाधव, मिश्रक अशोक गाडेकर, संगीता सिरसाट, उषा पवार यांनी सहकार्य केले. श्री. राजपूत यांनीही नागरिकांना हृदयाची काळजी घेण्यासाठी व्यायाम, प्राणायाम व आहार -विहार बाबत मार्गदर्शन केले.