शिरजगाव सोसायटीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेतर्फे सत्कार

वैजापूर,३० सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील शिरजगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या संचालक व पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेच्यावतीने उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे यांनी शुक्रवारी (ता.30) सत्कार केला.

सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन श्रीमती कांताबाई लक्ष्मण नेहे, व्हाईस चेअरमन बंडू भीमराज वराडे  यांची बिनविरोध निवड झाल्याने शिवसेनेच्यावतीने  उपजिल्हा प्रमुख अविनाश गलांडे, उपतालुका प्रमुख डाॅ. प्रकाश शेळके,  सिताराम भराडे, भिमाशंकर तांबे यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

यावेळी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक सोमनाथ नेहे, बाबासाहेब गंगाधर सातपुते,एकनाथ साळवे, शिवाजी राऊत, ज्ञानेश्वर वायळ, श्रीमती मुक्ताबाई धात्रक पॅनल प्रमुख रामेश्वर  नेहे, विश्वनाथ वराडे, दिलीप नेहे, रामेश्वर वराडे, विजय वराडे, सावकार शिरसाठ, तात्यासाहेब निंबाळकर, राहुल धात्रक, विवेक राजे  निंबाळकर, पोपटराव धात्रक, संजय जगताप, रामेश्वर झिने, नारायण मुर्तडक रामा भवर अनिल डांगे,मंगलाताई नेहे, आप्पा नेहे.बापू नेहे.कृष्णा भवर, महालगांव सोसायटीचे चेअरमन पुंजाराम काळे, माजी बाजार समिती संचालक सुरेश आल्हाट, राजु गलांडे, योगेश मोहिते,संपत जाधव यांच्यासह  ग्रामस्थ हजर होते.