मनातच सर्व विस्ताराच बीज-(स्वर्वेद पंचम मण्डल द्वितीय अध्याय)

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

माया जग स्थूल है, सो सब बाहर देख । 

 सुक्षम माया मनहिं है, अन्तर घट में पेख ।।२६।।

(स्वर्वेद पंचम मण्डल द्वितीय अध्याय)०५/०२/२६

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

आपण जे बाहेर पाहातो, ते सगळे जग ही स्थूल माया आहे. सूक्ष्म माया मन आहे ,  तीला आपल्या शरीरात पाहावे.

दोहा

बिज अधार में वृक्ष है, मन में जग विस्तार । 

मन मारे जग नहिं रहे,शब्द में सुरति सम्हार ।।२७।। (स्वर्वेद पंचम मण्डल द्वितीय अध्याय) ०५/०२/२७ 

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

बीजामध्ये जसा वृक्ष आहे, त्याचप्रमाणे मनातच सर्व विस्ताराचं बीज आहे.  मन मेल्यानंतर संसार (जग) रहात नाही म्हणजेच त्याचा उपद्रव होत नाही. म्हणून अनुभवी संत मन-मायेला सोडून शब्द परम पुरुषात (परमेश्वरात)  आपल्या सुरतिचा (आत्म्याच्या चेतन शक्तीचा) निरोध (शक्तीला केंद्रीत) करतात.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org